IAS Pooja Khedkar Saam Tv
मुंबई/पुणे

Pooja Khedkar News : पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ; दिल्ली पोलीस पुण्यातील घरापर्यंत पोहोचले, चौकशी सुरु

Pooja Khedkar News : पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांची गृन्हा शाखा पथक पुण्यातील तिच्या घरापर्यंत पोहोचली आहे. पोलिसांनी पूजा खेडकरच्या शेजारी राहणाऱ्यांकडून चौकशी सुरु केली आहे.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पूजा खेडकर अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा पुण्यात पोहोचली आहे. सोमवारी दिवसभर दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने पुण्यात पूजा खेडकर प्रकरणाचा तपास केला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने जिल्हाधिकारी कार्यालय, स्थानिक पोलीस, पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्राशी संबंधित शासकीय कार्यालये यांच्याकडे चौकशी केली. पूजा खेडकर प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींकडे देखील तपास करण्यात आला आहे.

पूजा खेडकरच्या पुण्यातील सर्व रहिवासी पत्त्यावर जाऊन सोसायटमधील लोकांकडे देखील चौकशी करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचं गुन्हे शाखा पथक आज अहिल्यानगरमध्येही जाऊनही तपास करणार आहे. युपीएससीच्या तक्रारीवरुन दिल्ली पोलीसांनी पूजा खेडकरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पूजा खेडकरला पाठवण्यात आली होती अंतिम नोटीस

दरम्यान, पूजा खेडकरला अंतिम नोटीस पाठवण्यात आली होती. डीओपीटीने दिलेल्या नोटिशीला पुन्हा एकदा कोणतेही उत्तर दिले नसल्याचे समोर आलं होतं. विभागाने बजावलेल्या नोटिशीनुसार तिला ठराविक मुदत देण्यात आल्यानंतरही नोटिशीला तिने प्रतिसाद दिलेला नव्हता. यापुढे तिला कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नोटीसला उत्तर न दिल्याने खेडकर हिच्या घरावर ही नोटीस लावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

Weight Loss Tips: हिवाळ्यात खा हे पदार्थ, पोटाची ढेरी होईल कमी, दिसाल सडपातळ

French Fries Recipe: घरच्याघरी बनवा हॉटेलसारखे कुरकुरीत अन् टेस्टी फ्रेंच फ्राइज

Viral Post: ट्रांस्परंट पाकिटात डिलिव्हर झाली 'ती' खाजगी वस्तू, ऑफइसमध्ये सर्वांसमोर व्हावे लागले लज्जीत

Health: टवटवीत चेहरा आणि काळ्याभोर केसांसाठी उपयुक्त ठरेल तुमच्या किचनमधील 'हा' पदार्थ; सुरकुत्याही म्हणतील बाय बाय

SCROLL FOR NEXT