बेळगाव मध्ये मराठी माणसाचा नव्हे, संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव - देवेंद्र फडणवीस -SaamTV
मुंबई/पुणे

बेळगाव मध्ये मराठी माणसाचा नव्हे, संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव - देवेंद्र फडणवीस

बेळगाव महापालिकेत 15 पेक्षा जास्त मराठी उमेदवार विजयी झाले आहेत, मराठी माणूस कधीच पराभूत होत नाही.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी बेळगाव (Belgaum) पालिकेच्या निवडणूकांबाबत वक्तव्य केलं आहे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झाला असं राऊत म्हणत आहेत मात्र हा मराठी माणसांचा नाही तर संजय राऊतांच्या (Sanjay Raut) अहंकाराचा पराभव झाला आहे तसेच बेळगाव महापालिकेत 15 पेक्षा जास्त मराठी उमेदवार विजयी झाले आहेत आणि मराठी माणूस कधीच पराभूत होत नाही असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाना साधला आहे.(Defeat of ego of Sanjay Raut and not of Marathi man in Belgaum)

हे देखील पहा-

बेळगाव महापालिकेमधील (Belgaum Municipal Corporation) महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव शिवसेनेच्या (Shivsena) चांगलाच जिव्हारी लागला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत हे या निकालावरुन सतत भाजपवर टीका करत आहेत मराठी माणसाच्या पराभवानंतर ऱाज्यातील भाजप नेते पेढे वाटत आहेत, जल्लोष करत आहेत, भाजपा मराठी माणसाच्या विरोधात आहेत का? आणि मराठी माणूस हरला म्हणून यांना आंनद का होतोय? असही ते म्हणाले होते. तसेच तुम्ही जर बेळगावात भगवा फडकला म्हणत आहात तर पालिकेच्या पहिल्याच ठरावात बेळगाव महाराष्ट्रात विलीन करा 'तरच तुमचा भगवा खरा' असं परखट ट्विट् (Tweet) राऊतांनी केलं होतं'. या राऊतांच्या वक्तव्याना प्रत्युतर देताना फडणवीसांनी राऊतांना टोला लगावला आहे हा पराभव मराठी माणसाचा नसून तो संजय राऊत यांच्या अहकाराचा पराभव असल्याच ते म्हणाले.

गोवा आणि युपीत भाजपाच जिंकेल

गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून निवड झाल्यानंतर आज फडणवीस पत्रकारांशी बोलत होते यावेळी त्यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांचे आभार मानले. तसेच गोव्याच्या 4 निवडनूका मी बघितल्या आहे, त्यामुळे मला गोवा नवीन नाही, मनोहर पर्रीकर यांच्या शिवाय निवडणूक होणार आहे तरीही गोव्यात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येईल, विकास आणि मोदींच्या नेतृत्वात गोवा निवडणूक लढू आणि ती जिंकू तसेच यूपी मध्येही भाजपचाच विजय होईल असही फडणवीस म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT