Deep Clean Campaign In Kalyan Dombivli Saam Tv
मुंबई/पुणे

Deep Clean Campaign Started: कल्याण डोंबिवलीत डीप क्लीन मोहिमेला सुरुवात; मोहिमेमुळं स्वच्छतेला वेग येईल- खासदार श्रीकांत शिंदे

Deep Clean Campaign : कल्याण डोंबिवलीत डीप क्लीन मोहिमेला सुरुवात झालीय. या मोहिमेमुळं स्वच्छतेला वेग येईल, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Deep Clean Campaign In Kalyan Dombivli

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात डीप क्लीन ड्राइव्ह सुरू झालंय. महापालिका स्वच्छता करतेच, मात्र या मोहिमेमुळं स्वच्छतेच्या कामाला वेग आलाय, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. (latest news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड महापालिका आयुक्त इंदू राणी जाखड उपस्थित (Mumbai) होते.

सर्वांनी एकत्र येऊन काम करावं

शहरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी धूलिकण कमी करणे. संपूर्ण शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते सखोल पद्धतीने स्वच्छ करून धुवून घेणे, या उद्देशानं ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी पावर स्वीपिंग मशीनसह अत्याधुनिक यंत्रणा, कर्मचारी, अधिकारी सज्ज करण्यात आले होते.

यावेळी ही मोहिम राबविल्यामुळं आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांचे आभार मानले. यावेळी बोलताना आमदार गणपत गायकवाड यांनी महापालिका क्षेत्रात मुख्य रस्त्यांची साफसफाई केली जाते. मात्र, अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता केली जात नाही. कल्याण पूर्व येथील स्वच्छतेची अवस्था अत्यंत बिकट आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं आवाहन (Deep Clean Campaign) केलंय.

प्रत्यक्षात काम करावं

डीप क्लीन मोहिम सातत्यानं राबवली पाहिजे, अशी सूचना केली. अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये न बसता प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करावं, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना दिलाय.

नरेंद्र मोदी पंतप्रधान (pm modi) झाल्यानंतर लोकांपर्यंत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. घनकचरा विभागातील कामगारांचं नियोजन महापालिकेने करावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेला विशेष नागरिकांनी देखील स्वच्छतेबाबत सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

SCROLL FOR NEXT