Congress On RBI Decisio
Congress On RBI Decisio Saam Tv
मुंबई/पुणे

RBI Decision on 20000 note: दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय भाजपचं षडयंत्र, काँग्रेसचा गंभीर आरोप

Satish Kengar

Congress On RBI Decision: भारतीय रिझर्व बँकने (Reserve Bank of India) २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या निर्णयावरून आता राजकारण सुरु झालं आहे. या निर्णयावरून विरोधी पक्षनेते भाजपला लक्ष्य करत आहेत. यातच दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

याबद्दल बोलताना कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, ''केंद्र सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय हे भाजपचाच एक षडयंत्र असून याचे रंग कसबा आणि कर्नाटक निवडणुकीच्या वेळेसच दिसले होते.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले की, ''अर्थव्यवस्थेतला पैसा हा भाजपच्या तिजोरीत जात असल्यामुळे आता घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागेल.''

आरबीआयच्या निर्णयावर मुख्यमंत्री काय म्हणाले?

२००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या आरबीआयच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''आरबीआयने निर्णय विचार पूर्वक घेतला असेल. सर्व सामान्य माणसाला २००० रुपयांच्या नोटा असतात का?''

अर्थतज्ज्ञाचं काय आहे म्हणणं?

याबाबत बोलताना अर्थतज्ज्ञ अभय टिळक म्हणाले की, दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा धोरणात्मक असून याचा सामान्यांवर फारसा फटका बसणार नाही.

ते म्हणाले, ''या निर्णयामुळे विशेषतः जे ठोक व्यवसाय करतात यांच्यावर थोडा परिणाम होईल. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर डिजिटल पेमेंट हे वेगाने वाढत असल्यामुळे सामान्यांसाठी हा निर्णय २०१६ साली घेण्यात आलेल्या निर्णयापेक्षा नक्कीच कमी क्लेशदयी असेल.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना भाजपचा मोठा झटका

Parbhani News : विहिरीचे खोदकाम जेसीबीने; रोहयोच्या संतप्त मजुरांनी पंचायत समितीतच प्राशन केले किटक नाशक

Prajwal Revanna: प्रज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ, अटकेसाठी ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Aditi And Siddharth Engagement : अदिती-सिद्धार्थने ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा का केला?, अभिनेत्रीने एका महिन्यानंतर केला खुलासा...

Maharashtra Politics: जाहिरातीतील पॉर्नस्टारवरून भाजप अन् ठाकरे गटात जुंपली; चित्रा वाघ यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर

SCROLL FOR NEXT