School Reopen: ८ दिवसात पुण्यातील शाळांबाबत निर्णय- अजित पवार  Saam Tv
मुंबई/पुणे

School Reopen: ८ दिवसात पुण्यातील शाळांबाबत निर्णय- अजित पवार

कोरोनाचा आढावा घेऊन निर्णय घेणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेमध्ये शहरात वाढत्या रुग्णसंख्येने शहारातील शाळा आणि कॉलेजस (school )अद्यापही बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र गेल्या ८ दिवसामध्ये रुग्णसंख्येची स्थिती लक्षात घेऊन या विषयीचा निर्णय येत्या ८ दिवसामध्ये निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar ) यांनी यावेळी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणा कार्यक्रमाकरिता ते पुण्यात उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

७ दिवसामध्ये शाळेची घंटा? तिसऱ्या लाटेत केवळ शाळा कॉलेजसचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण काही ठिकाणी शाळा (School) सोमवारपासून सुरु झाले आहे. येत्या १ फेब्रुवारी पासून कॉलेज सुरु करणार असल्याचे सूतोवाच शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले आहे. या आठवड्यामध्ये आम्ही महापौर, खासदार, सर्व लोक प्रतिनिधी , प्रशासकीय अधिकारी एकत्रित बसून निर्णय घेणार आहे. यावेळी पुण्यात रुग्णांची स्थिती काय राहिल हे पाहून त्यावर चर्चा करून पुण्यातील शाळांचा निर्णय घेणारा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिली आहे.

हे देखील पहा-

तिसऱ्या लाटेमध्ये व्यवसायाला फटका नाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत व्यवसाय आणि व्यवहारावर फार परिणाम झाला नाही. दुसऱ्या लाटेमध्ये सगळे ठप्प झाले होते सगळ्यांची रोजी रोटीचा सवाल देखील थांबल होत. मात्र, या लाटेमध्ये महाविकास आघाडी सरकारने तसे होऊन दिले नाही. तिसऱ्या लाटेमध्ये केवळ शाळा कॉलेजसचा प्रश्न निर्माण झाला. पण काही ठिकाणी शाळा सोमवारपासून सुरु झाले आहेत असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

गेल्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आली होती. मागील आठवड्यामध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यात सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीमध्ये कोरोना अजून देखील ८ दिवसांची तरी आकडेवारी खाली येणार नाही. त्यामध्ये पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हटी रेट २७ टक्के आहे. त्यामुळे अजून १ आठवडा शाळा सुरू करू नये, या विचारावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानंतर शहरातील महाविद्यालये सुरु करण्याविषयी निर्णय घेणार आहोत. तो पर्यंत निर्णय घेणार नाही. कोणत्याही प्रकारची रिस्क नको, म्हणून ही शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेण्यत आला आहे. कोरोना विषयीच्या नियमावलीचा निर्णय घेत असताना आम्ही सर्वाना विचारात घेतो असा टोला देखील त्यांनी भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

SCROLL FOR NEXT