mumbai accident  Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident : मुंबईच्या सेनापती बापट मार्गावर भीषण अपघात; टॅक्सी चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

Mumbai dadar Accident update : मुंबईच्या सेनापती बापट मार्गावर भीषण अपघात झालाय. या अपघातात टॅक्सी चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Mumbai Accident : राज्यात अपघाताचे सत्र सुरु आहे. मुंबईच्या दादरमध्ये शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. दादरच्या सेनापती बापट फ्लायओव्हरवर काळी-पिवळी टॅक्सी आणि कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर रस्त्यावर एकच धावाधाव झाली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाल्याचं दिसून आलं.

मुंबईच्या दादरमध्ये शनिवारी दुपारी १.१५ वाजता भरधाव कारने काळ्या पिवळ्या टॅक्सीला धडक दिली. या अपघातात काळ्या पिवळ्या टॅक्सीचा चालक आणि एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. टॅक्सी चालक चिंचपोकळीच्या दिशेने निघाला होता. तर दुसरी कार हा वांद्रेच्या दिशेने निघाली होती. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने कार चालकाला तातडीने ताब्यात घेतलं.

दादरमधील अपघातस्थळावरून विदारक दृश्ये समोर आले आहेत. टॅक्सीतील प्रवासी महिलेचा जागीच जीव गेला. तिचा मृतदेह टॅक्सीमध्ये आहे. तिचा हात कारच्या खिडकीवर आहे. अपघातात टॅक्सीच्या बोनेटचा चक्काचूर झाला आहे. दुसऱ्या कारच्या पुढील भागाचं नुकसान झालं आहे. ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर अपघातातील जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातानंतर तब्बल अर्धा तासांनी वाहतूक सुरळीत केली.

नवी मुंबईत अपघातात एकाचा मृत्यू

नवी मुंबईच्या उरणमध्ये काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला. या अपघातात ६४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. नवी मुंबईत मध्यरात्री लिफ्टर मशीनच्या धडकेत ६४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. नवी मुंबईच्या उरणमध्ये शिपिंग कंटेनर यार्डात ही अपघाताची घटना घडली. मशीन ऑपरेटरला समोर ६४ वर्षीय व्यक्ती नजरेस न आल्याने त्याचा अपघातात मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Recruitment: खुशखबर! LIC मध्ये नोकरीची संधी; मिळणार भरघोस पगार; अर्ज कसा करावा?

Papad Rassa Bhaji :गावरान स्टाईल पापडाची रस्सा भाजी कशी बनवायची? मिनिटांतच होईल फस्त

Maharashtra News Live Update: बदलापुरात अवकाळीसोबत गारांचा वर्षाव

Riteish Deshmukh Son Debut: रितेश देशमुखच्या मुलाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, 'राजा शिवाजी' चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका

BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT