Yashashri Shinde Case Saam Digital
मुंबई/पुणे

Yashashri Shinde Case: यशश्रीची हत्या का केली? दाऊदचा धक्कादायक खुलासा

Uran Yashashri Shinde Case : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यासंदर्भात खुलासे केलेत.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या उरण हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटकमधून अटक करण्यात आली. त्यानंतर दाऊदने यशश्रीची हत्या का केली? यासंदर्भात खुलासे केलेत. तर यशश्रीने लग्न करून कर्नाटकला येण्यास नकार दिल्यानेच तिचा खून केला, अशी कबुली देतानाच आपण या हत्याकांडाचा कट कसा रचला? याविषयी दाऊदने धक्कादायक खुलासे केलेत.

यशश्रीची हत्या, दाऊदचे खुलासे

दाऊद - लग्न करून कर्नाटकला चल...

यशश्री - नाही.

दाऊद - भेटण्यासाठी उरणला ये.

यशश्री - नाही.

दाऊद - माझ्याकडे असलेले तुझे फोटो फेसबुकवर अपलोड करीन.

यशश्री - प्लीज तसं करु नको.

दाऊद - मग भेटायला ये.

यशश्री - येते. पण फोटो डिलीट कर.

दाऊद - फोटो डिलीट केले आता लग्न करून कर्नाटकला चल

यशश्री - मी कर्नाटकला येणार नाही

दाऊद - ती येत नव्हती म्हणून मी धारदार शस्त्राने तिची हत्या केली. मोबाईल व शस्त्र घेऊन कळंबोलीहून कर्नाटकची बस पकडून गावी गेलो.

दाऊदने ज्या शस्त्राने यशश्रीचा काटा काढला ते शस्त्र आणि फोटोंचा अजून शोध सुरु असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमित काळेंनी दिलीय.

यशश्रीच्या हत्या प्रकरणी पनवेल न्यायालयाने दाऊदला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावलीय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यशश्रीला न्याय देण्याची भूमिका घेतलीय. मात्र पोलिस तपासात आणखी कोणते खुलासे समोर येतात आणि यशश्रीला न्याय कधी मिळतोय? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT