Darshana Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Darshana Pawar CCTV Footage : तोंडावर स्कार्फ, पाठीवर बॅग... दर्शना पवार-राहुल हांडोरेच्या शेवटच्या भेटीचा VIDEO समोर

Darshana Pawar Death Case : राजगडावर दर्शनासोबत गेलेला राहुल त्या दिवसापासूनच गायब होता.

साम टिव्ही ब्युरो

Pune News : राज्यसेवा आयोगाच्या ( MPSC) परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हांडोरेला अखेर अटक केली आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी 16 जून रोजी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. राजगडावर दर्शनासोबत गेलेला राहुल त्या दिवसापासूनच गायब होता.

राजगडावर जाताना दर्शना पवार आणि राहुल एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. राहुलच्या बाईकवर दर्शना मागे बसलेली दिसत आहे. दर्शना तोंडाला स्कार्फ बांधून बिनधास्त राहुलच्या मागे बसली होती.

मात्र आपल्या आयुष्यातील हा शेवटचा प्रवास असेल अशी किंचिंतशी शंकाही तिच्या मनात आली नसेल. कारण 12 जूनच्या सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास राजगड किल्ल्यावर दोघेही जाताना दिसले. मात्र 11.45 च्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसला.

पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी आज पत्रकार परिषद घेतल याबाबत सविस्तर माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, दर्शनाने राहुलला लग्नासाठी नकार दिला होता. यातूनच राहुलने तिची हत्या केल्याचा संशय आहे, असं पोलीस अधीक्षकांनी म्हटलं.  (Pune News)

दर्शना हिच्या मामाचे घर आणि राहुलचे घर बाजूला होते तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. राहुलसुद्धा MPSCची तयारी करत होता आणि फूड डिलिव्हरी बॉय म्हणून पुण्यात काम करत होता.

दर्शनाच्या शरीरावर हल्ल्याचे निशाण

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनाच्या शरीरावर हल्ल्याचे निशाण होते. शिवाय दर्शनाच्या डोक्यावर दगडाने खून केल्याच्या खुणा देखील होत्या. राहुलची चौकशी अजूनही बाकी आहे.

आज त्याला कोर्टात नेण्यात येईल आणि राहुलच्या पोलीस चौकशीसाठी कोर्टाकडे मागणी केली जाईल. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि हत्यारे अद्याप जप्त केलेली नाही, असेही पोलिसांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT