Dombivali News Saam Tv
मुंबई/पुणे

Woman falls Off train near Dombivli : लोकलगर्दीचा बळी! डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Train News: धावत्या लोकलमधून पडून एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना डोंबिवली कोपर स्थानकाजवळ आज २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धावत्या लोकलमधून पडून एका २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना डोंबिवली (Dombivali)कोपर स्थानकाजवळ आज २९ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली.रिया श्यामजी राजगोर असे या तरुणीचं नाव आहे .या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणी डोंबिवली पूर्व येथे आपल्या कुटुंबासह राहत होती. आई-वडील आणि भाऊ असा तरुणीचा परिवार होता. रिया ठाण्यातील(Thane) एका कन्स्ट्रक्शन कार्यालयात कार्यरत होती. दररोज ती ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडून ठाण्यात जायची. आज सकाळी ठरल्याप्रमाणे तिने डोंबिवली रेल्वे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पकडली.

लोकलच्या आत शिरण्याचा प्रयत्न करत होती मात्र लोकलमधील गर्दीमुळे ती दरवाजाजवळच थांबली. मात्र गर्दीमुळे डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान तिचा तोल गेल्या. तोल गेल्यानंतर लोकल खाली पडून तिचा दुर्देवी मृत्यू झाला. तात्काळ प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

या आधी देखील अनेक प्रवासी डोंबिवली ते कोपर दरम्यान गर्दीचा बळी ठरलेत. त्यामुळे रेल्वे या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रवाशांकडून अनेकदा डोंबिवलीहून सोडण्यात येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाते.मात्र अद्याप ही ही मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे लोकल सेवा कधी वाढवणार असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT