सुमित सावंत
Mumbai Dahi Handi News : मुंबईत प्रचंड उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे. सकाळपासून गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यात येत आहेत. तब्बल दोन वर्षानंतर गोविंदा पथके कोरोना विषयक निर्बंधमुक्त दहीहंडी (Dahi Handi) साजरी करीत आहेत. एकीकडे दहीहंडी उत्साहात साजरी करताना दुसरीकडे दहीहंडीला गालबोट देखील लागले आहे. मुंबईत (Mumbai) वेगवेगळ्या ठिकाणी १११ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदावर मुंबईच्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही गोविंदांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये दुपार पर्यंत १११ गोविंदांना दुखापत झाली, यामधील ८८ जणांना उपचार करून सोडून देण्यात आलं आहे. तर २३ जणांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या कोणत्याही गोविंदाची प्रकृती गंभीर नाही. जखमी झालेल्या गोविंदांपैकी जेजे रुग्णालयात ९, नायर रुग्णालयात ११, केईएममध्ये ३०, ट्रॉमा रुग्णालयात ०६, कुपर रुग्णालयात ०६, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवलीमध्ये ०२, पोद्दार रुग्णालयात ०६, सेंट जॉर्ज रुग्णालय - ०३, सायन रुग्णालय - ०९, व्ही. एन. देसाई रुग्णालय - ०८, राजावाडी रुग्णालय - १०, एम टी रुग्णालय - ०१, वांद्रे भाभाा रुग्णालय - ०५ गोविंदांवर उपचार करण्यात आले.
रात्री ९ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. तर केवळ २३ गोविंदावर अद्याप उपचार सुरू आहेत. या तेवीसही गोविंदांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईत अद्याप अनुचित घटनेची नोंद झालेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
दरम्यान, दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी झाल्यास त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.मृत व जखमी गोविंदांसाठी सहाय्य यानुसार गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास १० लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला ५ लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.