मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाचं नाव बदलून चैत्यभूमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयामुळे नव्या चर्चेला सुरुवात झालीये. सोशल मीडियावरही या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. काही जणांनी दादरची ऐतिहासिक ओळख बदलण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केलीये. पण दादर स्थानकाचं नाव चैत्यभूमी करण्याची मागणी आजची नाही. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
2023 मध्ये मुंबई काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष आणि उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दादर रेल्वे स्थानकाचं नाव चैत्यभूमी करण्याची मागणी केली होती. एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्यात आलं. त्याचप्रमाणे नवीन ओशिवरा स्थानकाला राम मंदिर असं नाव देण्यात आलं. मग दादर स्थानकाच्या नामांतराची अनेक वर्षांपासूनची मागणी का पूर्ण होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अविनाश महातेकर यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लगेचच दादर स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु रेल्वे विभागाकडून यासाठी सतत उशीर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, असंही महातेकर यांनी म्हटलंय.
काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सचिन सावंत यांनी मात्र या निर्णयाला झालेल्या उशिरावर प्रश्न उपस्थित केलंय. सरकारने नामांतराचा निर्णय घेण्यास एवढा वेळ का लावला, याचं उत्तर दिलं पाहिजे. प्रभादेवी स्थानकाचं नाव बदलताना सरकारला प्रक्रिया माहिती होती, मग दादरच्या बाबतीत उशीर का झाला? त्याचबरोबर इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं कामही अद्याप पूर्ण का झालेलं नाही, याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
दादर रेल्वे स्थानकाला सुमारे 170 वर्षांचा इतिहास आहे. या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. पण हा निर्णय अद्याप पूर्ण झाला नव्हता.
ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या (GIPR) महिम रोड स्टेशनची सुरुवात झाली. हेच स्टेशन आज दादर म्हणून ओळखलं जातं. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात हे स्टेशन सुरू झाल्याची नोंद आहे.
महिम रोड स्थानकाचं नाव बदलून दादर करण्यात आलं.
बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वेने (BB&CIR) म्हणजेच सध्याच्या पश्चिम रेल्वेने बॉम्बे बॅकबे ते विरार दरम्यान पहिली लोकल सेवा सुरू केली. या मार्गावर दादर स्थानकाचाही समावेश होता. काही जुन्या नोंदींमध्ये दादरचा उल्लेख 'दादूर' असा करण्यात आलाय.
6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं दादरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढे हेच ठिकाण चैत्यभूमी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. बाबासाहेबांचं दादरमधील राजगृह या निवासस्थानी वास्तव्य होतं.
तेव्हाचे रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांनी दादर स्थानकाचं नाव बदलण्याची घोषणा केली होती. त्यावेळी दादरहून कोकण रेल्वेच्या गाड्या सुरू करण्याच्या मुद्द्यावरून त्यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वाद झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा दादर स्थानकाचं नाव चैत्यभूमी करण्याची मागणी पुढे आणली होती. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मागणीला विरोध केला होता.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ही अनेक वर्षांपासूनची मागणी पुन्हा एकदा सरकारसमोर मांडली.
मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची नावं यापूर्वीही बदलण्यात आली आहेत. यामध्ये 2018 साली एलफिस्टन रोडचं नाव बदलण्यात आलं. या स्टेशनचं नाव बदलून प्रभादेवी करण्यात आलं. याशिवाय मुंबईतील अजून काही स्टेशन आहेत, ज्यांचं नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
मरीन लाईन्स- मुंबादेवी
चर्नी रोड- गिरगाव
कॉटन ग्रीन- काळाचौकी
डॉकयार्ड रोड- माझगाव
करी रोड- लालबाग
सँडहर्स्ट रोड- डोंगरी
किंग्ज सर्कल- तीर्थंकर पार्श्वनाथ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.