Dadar-Ratnagiri Passenger Konkan Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Konkan Railway : कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी! आता दिवा स्थानकातून सुटणार पॅसेंजर; वाचा सविस्तर

Dadar-Ratnagiri Passenger Konkan Railway News : कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर आता दिवा स्थानकावरून सुटणार आहे. सीएसएमटी-कुर्ला मार्गिकेवरील रखडलेल्या प्रकल्पामुळे रेल्वेने हा तात्पुरता निर्णय घेतला असून प्रवाशांची गैरसोय वाढणार आहे.

Alisha Khedekar

  • दादर-रत्नागिरी पॅसेंजर आता दिवा स्थानकावरून सुटणार

  • सीएसएमटी-कुर्ला मार्गिकेचा प्रकल्प १७ वर्षांपासून रखडलेला

  • लोकल सेवेला अडथळा टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय

  • प्रवाशांना दिवा स्थानक गाठावे लागणार, गैरसोय वाढणार

कोकणवासीयांसाठी मोठी बातमी. कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ही पुढील काही कालावधीसाठी दिवा स्थानकातूनच सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सीएसएमटी ते कुर्ला या स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील प्रकल्प रखडलेला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दादर-रत्नागिरी रेल्वे सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणवासीयांच्या पदरी निराशा आली आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला ते सीएसएमटी दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम रखडले आहे. या तांत्रिक कामामुळे रेल्वेच्या परिचालन क्षमतेवर मर्यादा येत असल्याने प्रवाशांना आता पॅसेंजर पकडण्यासाठी दिवा स्थानक गाठावे लागणार आहे.

रत्नागिरी पॅसेंजर ही ट्रेन दिवा स्थानकाच्या उपनगरीय मर्गावरुन जात असताना चार रुळांचे क्रॉसिंग करावे लागत होते, त्यामुळे सात ते आठ लोकलचा खोळंबा व्हायचा. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून, ही ट्रेन दिवा स्थानकावरुनच चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान दादर-गोरखपूर ट्रेन इगतपुरी मार्गे जात असल्याने दिव्यावरुन या मार्गे जाणाऱ्या ट्रेनचा इतर कोणत्याही ट्रेनवर परिणाम होणार नसल्याचे रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी म्हटले.

रेल्वेच्या या निर्णयामुळे दादरहून गाडी पकडणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे, यात शंका नाही. मात्र, प्रशासनाच्या मते हा बदल तात्पुरता असून व्यापक हिताचा आहे. दरम्यान आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दादर सोडून दिवा स्तहनकात रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनची वाट पाहावी लागणार आहे. तसेच कोकणवासीयांची पिढ्यांपिढ्या जवळची असणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी पुन्हा दादर स्थानकातून पुन्हा कधी धावणार? याकडे आता सर्व प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंजनगावातील खेलोबा मंदिरात पोलिसांची सुरक्षा वाढवली

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप! माजी मंत्री बच्चू कडूंवर भाजप आमदारच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गुन्हा

Wedding Makeup Tips: लग्नसराईत सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेकअप राहिलं तसाच, फॉलो करा या सिक्रेट टिप्स

Deool Band 2: ११ वर्षांच्या प्रतीक्षे नंतर स्वामी पुन्हा येणार...; प्रविण तरडेंचा 'देऊळ बंद २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Petrol formation: पेट्रोल कसं तयार होतं तुम्हाला माहितीये का?

SCROLL FOR NEXT