मुंबई/पुणे

Maharashtra Government Employees : गुड न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांची होळीआधीच दिवाळी; महागाई भत्ता वाढला

Maharashtra Government Employees Latest News : सरकारी कर्मचाऱ्यांची होळीआधीच दिवाळी झाली आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महागाई भत्त्यात तब्बल ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची होळीआधीच दिवाळी झाली आहे.

राज्य सरकारच्या महागाई भत्यात वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात थकबाकीसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार, १ जुलै २०२४ पासून सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनावरील महागाई भत्ता ५० वरून ५३ टक्के करण्यात आला आहे.

महागाई भत्त्याचा कालावधी १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ असा असेल. या कालावधीतील रक्कम थकबाकीसह फेब्रुवारी 2025 च्या वेतानासह रोखीने देण्याचा जीआर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीआधीच दिवाळीचं गिफ्ट मिळालं आहे.

आदेशात काय म्हटलंय?

आदेशानुसार, १ जुलै २०२४ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलै २०२४ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीचा महागाई भत्ता हा फेब्रुवारी, २०२५ च्या वेतनात मिळणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम ही विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धतीनुसार लागू होईल. यासाठी होणारा खर्च शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात. त्यानुसार लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुरी विधानसभा पोटनिवडणूक: दुपारी 3 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान

MCA awards ceremony: MCA अवॉर्ड्समध्ये शार्दुल-सिद्धेशचा दबदबा, आयुष म्हात्रेसह वर्ल्ड कप स्टार्सचा सन्मान

Nagpur : अति व्यायामामुळे फाटली मेंदूतील रक्तवाहिनी; गोल्डन अवरमध्ये चमत्कार घडला, डॉक्टरांनी वाचवला तरुणाचा जीव

Marathi compulsory: मराठी शिकायचीच नसेल तर निघा; मराठमोळ्या गायकाचा परप्रांतियांना स्पष्ट शब्दात सल्ला

Young Age Heart Attack Reason: प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचं हॉर्ट अटॅकमुळे मृत्यू, कमी वयात हार्ट अटॅक येण्याची नेमकी कारणे काय?

SCROLL FOR NEXT