Maharashtra Weather Update News AI Image
मुंबई/पुणे

Weather Alert : ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Today Update News : बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याची शक्यता. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या पावसाचा आणि उष्णतेचा ताजा अंदाज.

Alisha Khedekar

  • ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राच्या वातावरणाला फटका

  • चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे

  • चक्रीवादळाच्या प्रभावामुळे काही भागांत वादळी पाऊस

  • यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत असलेले हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी दुपारनंतर हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून, त्यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या भागात मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात, विशेषतः पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. आज पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेचा तडाखा कायम आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असल्याने उष्णतेपासून दिलासा मिळण्याची चिन्हे कमी आहेत.

उद्या पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ पुढे सरकत असताना त्याचा परिणाम विदर्भातील हवामानावर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. उद्या पूर्व विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. राज्यातील इतर भागांत मात्र निरभ्र आकाश, वाढलेले तापमान आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार

Maharashtra News Live Update: आई राजा उदो उदो जयघोषात तुळजापुरात पाच लाखांवर भाविकांनी अश्विनी पौर्णिमेचा खेटा केला पूर्ण

MLC Election Result: महायुती की मविआ, का बंडखोर उमेदवार? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Tulsi leaves benefits: या 4 लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाल्लं पाहिजे तुळशीचं पान!

Tuesday Horoscope : कामाचा ताण असेल, ६ राशींच्या व्यक्तींना मिळेल मोठं गिफ्ट; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT