Kalyan cyber fraud case साम टीव्ही
मुंबई/पुणे

Kalyan : कल्याण हादरलं! फार्मा कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या; बँक स्टेटमेंट तपासताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली

Kalyan cyber fraud case : कल्याण पूर्वेत सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून एका फार्मा कंपनीतील झोनल मॅनेजरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही प्रतिनिधी, कल्याण

Kalyan cyber crime news : कल्याणात सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगच्या त्रासाला कंटाळून एका नामांकित फार्मा कंपनीतील झोनल मॅनेजरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत समोर आली आहे. मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात राहणारे हेमंत यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते एका नामांकित फार्मा कंपनीमध्ये झोनल मॅनेजर पदावर कार्यरत होते.

आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी हेमंत यांच्या भावाने त्यांच्या मित्रांशी संपर्क साधून चौकशी केली. त्यातील एका मित्राने सांगितले की, हेमंत यांनी त्याच्याकडे काही पैशांची मागणी केली होती. "मला कोणाला तरी दोन लाख रुपये द्यायचे आहेत. माझ्याकडे ४० हजार रुपये आहेत, पण मला अजून एक लाख साठ हजार रुपयांची गरज आहे," असे हेमंत यांनी मित्राला सांगितले होते.

या प्रकारानंतर कुटुंबीयांनी हेमंत यांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले असता धक्कादायक बाब समोर आली. १० जून २०२५ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांनी एका व्यक्तीला वारंवार पैसे पाठवल्याचे दिसून आले. चौकशीत समोर आले की, संबंधित व्यक्ती हेमंत पांडे यांना बदनामी करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होती. तुमचे फोटो किंवा व्हिडिओ मित्रांना पाठवून परिसरात व्हायरल करेन, अशी धमकी देत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली होती.

हेमंत यांच्या मृत्यूनंतर कोळशेवाडी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पुढील तपासात सायबर ब्लॅकमेलिंगचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित अज्ञात व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हेमंत यांना ब्लॅकमेल करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडा ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT