Fireworks News  Saam Tv
मुंबई/पुणे

Fireworks Seized : चीनमधून आणलेले ११ कोटींचे फटाके जप्त, न्हावा शिवा येथे कस्टम विभागाची कारवाई

Navi Mumbai News : दोन कंटेनरमधून अवैध मालाची तस्करी केली जात असल्याचा संशय कस्टम अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर अधिकाऱ्यांना कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली.

प्रविण वाकचौरे

Navi Mumbai :

JNPT च्या न्हावा शेवा येथे सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. 'मॉप रॉड आणि ब्रश क्लीनर' असल्याचं भासवून प्रतिबंधित फटाक्यांची तस्करी करणाऱ्या दोन कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांचे 40 मेट्रिक टन प्रतिबंधित चिनी फटाके जप्त करण्यात आले आहेत.

सीमाशुल्क नियमांनुसार, फटाक्यांची आयात करण्यावर बंदी आहे. फटाके आयात करण्यासाठी डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडकडून (DGFT) परवानगी घ्यावी लागते. रेड लीड आणि लिथियम सारख्या विषारी रसायनांसह निकृष्ट दर्जाच्या विदेशी फटाक्यांचा ओघ रोखण्यासाठी हा परवाना आवश्यक करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन कंटेनरमधून अवैध मालाची तस्करी केली जात असल्याचा संशय कस्टम अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर अधिकाऱ्यांना कंटेनर थांबवून त्याची तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये चीनमधून आयात केलेल्या मॉप्स आणि ब्रशेस असल्याचं सांगण्यात आलं. मात्र कंटेनरची तपासणी केला असता त्यामध्ये प्रतिबंधित फटाके असल्याचं उघड झालं. (Latest News Update)

डीजीएफटीकडून आयात परवाना मिळवण्याची प्रक्रिया कठीण आहे. त्यामुळे ही प्रक्रिया टाळून अवैध मार्गाने हे फटाके आणण्यात आले होते. सण आणि लग्नाच्या हंगामात या फटाक्यांची मोठी मागणी असते. ती पूर्ण करण्यासाठी आयातदार परदेशी मूळ फटाक्यांची तस्करी करतात, असं एका कस्टम अधिकाऱ्यांने सांगितलं. जप्त केलेले फटाके पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) कडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

Apple New CEO: Appleचे CEO बदलणार; १५ वर्षानंतर टिम कुक देणार राजीनामा; कोण सांभाळणार धुरा?

ऐन उन्हाळ्यात पाणीबाणी; मुंबई, ठाण्यात २ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

SCROLL FOR NEXT