csmt to shirdi and csmt to solapur vande bharat express new Stop Thane and kalyan Saam TV
मुंबई/पुणे

Vande Bharat ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; CSMT-शिर्डी, सोलापूर गाड्या आता या स्थानकावर थांबणार

Vande Bharat Express Latest: वंदे भारतने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या दोन गाड्यांना नवीन थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.

Satish Daud

Vande Bharat Express Latest: वंदे भारतने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या दोन गाड्यांना नवीन थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची माहिती बुधवारी एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबई-शिर्डी या वंदे भारत ट्रेनला मध्य रेल्वेने नवा थांबा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डीला जाणारी वंदे भारत ट्रेन आता कल्याण स्थानकात थांबेल. सीएसएमटी स्थानकावरून शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ होणारी गाडी सकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी कल्याण स्थानकावर पोहोचेल.

तर शिर्डीवरून मुंबईच्या दिशेने येणारी गाडी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी कल्याण स्थानकात पोहोचेल. वंदे भारतला दोन नवीन थांबे मिळाल्याने प्रवाशांना मोठा दिला मिळाला आहे. सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ते शिर्डी या वंदे भारत ट्रेनला दादर, ठाणे, नाशिक रोड या ठिकाणी थांबा आहे.

दररोज नियमितपणे ही गाडी सीएसएमटीवरून सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी शिर्डीला पोहोचते. तर शिर्डीवरून संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी निघते आणि रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचते.

दुसरीकडे सीएसएमटी स्थानकावरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला सुद्धा ठाणे स्थानका थांबा दिला जाणार आहे. सीएसएमटी स्थानकावरून निघाल्यानंतर ही गाडी ठाणे स्थानकात दुपारी ४ वाजून ३३ मिनिटांनी पोहोचेल. तर सोलापूरवरून सीएसएमटी स्थानकाकडे येताना ही गाडी ठाणे स्थानकात सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.

सध्या या गाडीला दादर, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी येथे थांबा आहे. ही गाडी सीएसएमटी स्थानकावरून दुपारी ४ वाजून ०५ मिनिटांनी निघते आणि सोलापूरला रात्री १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. तर सोलापूरवरून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी निघून सीएसएमटी स्थानकात दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते. दरम्यान, दोन्ही गाड्यांचे नवे थांबे ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत, असे मध्य रेल्वेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करा अन् ७१ लाख मिळवा; काय आहे योजना? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: वांगणी आणि बदलापूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा

Palak Paratha Recipe : पालकांनो सकाळी मुलांना घाईगडबडीत द्या पौष्टिक नाश्ता, झटपट बनवा 'पालक पराठा'

Phone Repair Tips: फोन दुरुस्तीसाठी देण्याआधी ‘ही’ कामं नक्की करा! अन्यथा होईल मोठा धोका

Sitaare Zameen Par : तारीख ठरली! आमिर खानचा 'सितारे जमीन पर' युट्यूबवर, किती रुपयांत पाहता येणार?

SCROLL FOR NEXT