INDIAN RAILWAYS APPROVES NEW DAILY CSMT TO SAWANTWADI EXPRESS | KONKAN RAILWAY NEWS Saam Tv
मुंबई/पुणे

CSMT - Sawantwadi : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतून नवीन एक्क्सप्रेस धावणार; कोणकोणत्या स्थानकावर थांबणार? वाचा

CSMT Sawantwadi Express Update News : भारतीय रेल्वेने मुंबई CSMT ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सेवेला मंजुरी दिली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या रेल्वे सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई CSMT ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे

  • 15087 आणि 15088 क्रमांकाच्या गाड्या दररोज धावणार

  • कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार

  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या रेल्वे सेवेच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.

नवीन वेळापत्रकानुसार मुंबईहून धावणाऱ्या गाडीचा क्रमांक १५०८७, तर सावंतवाडी रोडहून मुंबईकडे धावणाऱ्या परतीच्या गाडीचा क्रमांक १५०८८ असा असेल. ही एक्स्प्रेस दररोज धावणार असून दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

या सेवेचा सर्वाधिक फायदा मुंबईत शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी नियमित प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांना होणार आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीही हा रेल्वे पर्याय अधिक सोयीचा ठरेल.

भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. कोकणातील रेल्वे प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Health Tips: रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या 'या' मसाल्याचं पाणी; फायदे वाचून व्हाल थक्क!

Vijay-Trisha Viral Video: अजित कुमारच्या रेसिंग इव्हेंटमध्ये CM विजय आणि तृषा कृष्णन एकत्र; व्हिडीओ व्हायरल

Bribe Case : सरकारी कामासाठी लाच घेताना बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, ठाण्यात खळबळ

Relationship Tips : का वाढतोय घटस्फोटाचा ट्रेंड? जोडप्यांनी सांगितली लग्न तुटण्याची ७ मोठी कारणं

SCROLL FOR NEXT