5 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल; अवैध धंद्यांचा पोलिसांकडून भांडाफोड  जयश्री मोरे
मुंबई/पुणे

5 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल; अवैध धंद्यांचा पोलिसांकडून भांडाफोड

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई

जयश्री मोरे

मुंबई - मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीच्या गजबजलेल्या परिसरात, वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही शाखेची पदवी नसलेल्या किंवा कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बोगस डॉक्टर म्हणून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तसेच रुग्णांकडून फी म्हणून मोठ्या प्रमाणात पैसे लुबाडणाऱ्यांना अवैध डॉक्टरांवर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

शिवाजीनगर, गोवंडी परिसरात डॉक्टरांचा बोगस व्यवसाय करणाऱ्या इसमांची माहिती गुन्हे कक्ष सहाला सूत्रांनी दिली होती. त्यांच्यावर कारवाई करण्याकरीता महानगरपालिका अधिकारी आणि डॉक्टर यांची मदत घेण्यात आली. त्यांच्या मदतीने गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने शिवाजीनगर, गोवंडी परिसरातील एकाच वेळी ५ वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असता त्यावेळी बोगस डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करताना त्यांना आढळले.

हे देखील पहा -

या बोगस डॉक्टरांकडे कोणताही अधिकृत वैद्यकिय परवाना नसताना तसेच महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल मध्ये नोंदणी नसताना डॉक्टर असल्याचे भासवुन बेकायदेशिररित्या विविध आजारावरील रुग्णांना औषधे आणि इंजेक्शन देत औषोधोपचार करताना सापडून आले.

त्यांच्या ताब्यातुन स्टेथेस्कोप वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन, औषधे व इतर साहित्य जप्त करण्यात आलेले आहे. क्षमा क्लिीनीक, आलीशा क्लिनिक, आसिफा क्लिीनीक, रेहमत क्लिनिक, मिश्रा क्लिीनीक अशी या क्लिनिकची नावे आहेत. हे सर्व क्लिनिक बैंगण वाडी परिसरातील आहेत. या सर्व डॉक्टरांवर कलम 419, 420 सह महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशीयन ऍक्ट 33, 36 अंतर्गत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्हाला एकत्र आणायला बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरेंचा टोला

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT