Crime Pune : औंधमध्ये फ्लॅट नावावर कर म्हणत, सख्ख्या बहिणीला पेटवून दिले!
Crime Pune : औंधमध्ये फ्लॅट नावावर कर म्हणत, सख्ख्या बहिणीला पेटवून दिले!  SaamTvNews
मुंबई/पुणे

Crime Pune : औंधमध्ये फ्लॅट नावावर कर म्हणत, सख्ख्या बहिणीला पेटवून दिले!

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

पुणे : वडिलोपार्जित संपत्तीतून वाटा मिळावा यासाठी भावंडांमध्ये वादाच्या घटना नेहमी घडत असतात. पुण्यातील औंध परिसरात नात्याला काळिमा फासणारी अशीच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वडलांनी कमावलेल्या संपत्तीच्या वादातून सख्या मोठ्या बहिणीला (sister) पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न नराधम भावाने केला आहे. सदर घटनेत जखमी झालेल्या महिलेवर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, औंध परिसरातील अनुसया सोसायटीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली असून शरद मनोहर पतंगे (वय 45) असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

हे देखील पहा :

राजश्री मनोहर पतंगे ( वय 48) असं या घटनेत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. राजश्री पतंगे व शरद पतंगे हे दोघेही सक्खे भाऊ बहिण आहेत. दोघांना आणखी एक भाऊ असल्याचे समजते आहे. औंधमधील अनुसया हौसिंग सोसायटीमध्ये राजश्री राहत असून त्या अविवाहित आहेत. त्या राहता असलेला फ्लॅट हा त्यांच्या आईच्या नावावर असून गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आई आणि वडिलांचा मृत्यू झाला आहे. फ्लॅट नावावर करण्यावरून आरोपी शरद आणि राजश्री यांच्यामध्ये गेल्या अनके दिवसांपासून खटके उडत आहेत. आरोपी शरद सदर फ्लॅट आपल्या नावावर करून द्यावा अशी मागणी राजश्री यांच्याकडे करत होता.

परंतु, राजश्री यांचा फ्लॅट नावावर करण्याला नकार होता. शुक्रवारी दुपारी शरद हा दारू पिऊन राजश्रीच्या घरी आला व यावेळी देखील राजश्री आणि शरदमध्ये पुन्हा एकदा फ्लॅट नावावर करण्यावरून भांडण सुरू झाले. त्याने फ्लॅट नावावर कर म्हणत पुन्हा राजश्रीसोबाबत वाद घालायला सुरुवात केली. राजश्री यांनी पुन्हा नकार दिला, त्यामुळे आरोपी शरद याने चिडून रागाच्या भरात राजश्री यांच्या साडीला आग लावली आणि त्यांना पेटवून दिले. सुदैवाने लहान भाऊ हा देखील त्यावेळी घटनास्थळी होता. त्याने हि आग विझवण्याचा प्रयत्न केला, यात त्यालाही गंभीर इजा होऊन तो होरपाळून गेला.या घटनेत मात्र, राजश्री यांचा मानेपासून पायापर्यंतचा आणि चेहरा भाग पूर्णतः भाजला आहे. त्यांना तातडीने उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE : पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, मतदार केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा

Narendra Modi: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान करा; पंतप्रधान मोदीचं मतदारांना आवाहन

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT