Pune Crime News saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Khandve Nagar News: पुण्यातील खांदवे नगर भागात घरगुती वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • खांदवे नगरमध्ये पतीकडून पत्नीचा चाकूने खून झाल्याची घटना घडली.

  • मृत महिलेचे नाव ममता प्रेम चव्हाण असून ती तिच्या मावशीकडे राहत होती.

  • आरोपी प्रेम चव्हाणने घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्याला अटक केली.

  • पोलिसांकडून सध्या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा तपास सुरु आहे.

पुण्यातील खांदवे नगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीचा थेट गळ्यावर चाकूने वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना काल दुपारी तीनच्या सुमारास घडली. ममता प्रेम चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून ममता आणि प्रेम यांच्यात घरगुती वाद सुरू होते. सततचे भांडण आणि तणावामुळे ममता माहेरी जाण्याऐवजी त्यांच्या मावशीच्या घरी खांदवे नगर येथे राहत होती. मात्र, काल दुपारी अचानक प्रेम चव्हाण हे त्या घरी गेले आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला.

वादाचा राग इतका वाढला की प्रेमने जवळच असलेल्या चाकूने ममताच्या गळ्यावर सपासप वार केले. या क्रूर हल्ल्यात ममता यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी प्रेम चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करत तपास सुरू केला. काही वेळातच आरोपी प्रेम चव्हाणला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. मात्र नेमकं हे कृत्य त्याने कोणत्या कारणाने केले? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पुण्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील खांदवे नगरमध्ये नेमकी काय घटना घडली?

पतीने घरगुती वादातून पत्नीवर चाकूने वार करत तिची हत्या केली.

मृत महिलेचे नाव काय आहे?

मृत महिलेचे नाव ममता प्रेम चव्हाण आहे.

आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे का?

होय, पोलिसांनी प्रेम चव्हाण या आरोपीला अटक केली आहे.

हत्या का केली गेली यामागचे कारण काय आहे?

घरगुती वादामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केली. अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plastic Chair Cleaning Tips: प्लास्टिकची खुर्ची स्वच्छ कशी करायची? 5 सोप्या टिप्स समजून घ्या

Kadai Paneer Recipe: दिवाळीत घरच्या घरी बनवा रेस्टॉरंटसारखी चविष्ट कढाई पनीर, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: लक्ष्मीपूजनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये धुराचे साम्राज्य; फटाक्यांच्या धुरामुळे रस्त्यांवर दृश्यमानता घटली

Ladki Bahin Yojana : लक्ष्मीपूजन झालं, आता लाडकी बहिणीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Latur Crime News: लातूरमध्ये माणुसकीला काळिमा! प्रॉपर्टीसाठी बापानेच ७ वर्षांच्या मुलाची केली हत्या

SCROLL FOR NEXT