Sasoon Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime News : ससून रुग्णालयाबाहेर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

MD Seized by Pune Police : ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहे.

प्रविण वाकचौरे

अक्षय बडवे

Pune News :

पुण्यातील वाढती गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करत असताना दुसरं संकट पोलिसांसमोर उभं राहिलं आहेत. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात अडकू लागलंय की असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसात पुणे पोलिसांना अनेक कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहे.

आता पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर २ कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅम मेफिड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. (Pune News)

या ड्रग्स MD म्हणजेच मेफिड्रोनची किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे. यामागे हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी २ तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Crime News)

ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest marathi News)

रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. ससून रुग्णालयातील कुणी कर्मचारी या प्रकरणात आहेत का? या अनुषंगाने देखील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT