Crime News 8 year old girl Physical abuse by 53 year old man in Jogeshwari area ssd92 Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत ५३ वर्षीय नराधमाचा ८ वर्षीय मुलीवर अत्याचार; अंधेरी परिसरातील संतापजनक घटना

Andheri Crime News: कौटुंबिक ओळखीचा फायदा घेत एका ५३ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अंधेरीच्या जोगेश्वरी परिसरात घडली आहे.

Satish Daud

Mumbai Andheri Latest Crime News

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे अंधेरी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

कौटुंबिक ओळखीचा फायदा घेत एका ५३ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अंधेरीच्या जोगेश्वरी (Mumbai Crime News) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिला जोगेश्वरी परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहतात. तक्रारदार महिला तिसऱ्या मजल्यवर तर आरोपीचे घर तळमजल्यावर आहे. आरोपीच्या कुटुंबासोबत तक्रारदार महिलेची ओळख होती.

तक्रारदार महिलेला नोकरीला असल्याने कामावर जाताना ती आपल्या ८ वर्षीय मुलीला आरोपीच्या घरी सोडत होती. यादरम्यान, आरोपीने चिमुकलीवर वारंवार अत्याचार (Crime News) केला. काही दिवसांपूर्वी चिमुकलीने आरोपीच्या कृत्याची माहिती आपल्या आईला सांगितली.

मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तातडीने मेघवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारनुसार पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

Pune: 'येथे कचरा टाकणारा गाढव अन्...', पुणेरी बॅनरची सोशल मीडियावर चर्चा; नेटकरी संतप्त

Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

SCROLL FOR NEXT