cricket bat and ball canva
मुंबई/पुणे

Shocking News : चौकार लगावल्यानंतर अचानक छातीत दुखू लागलं; क्रिकेटपटूने मैदानातच सोडला जीव, क्रिकेट विश्वावर शोककळा

pune shocking news : ३५ वर्षीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. क्रिकेटपटूच्या मृत्यूने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे.

Vishal Gangurde

क्रिकेट विश्वाला हादरवाणारी घटना समोर आली आहे. पुण्यात ३५ वर्षीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे मैदानात २७ नोव्हेंबर रोजी बुधवारी ही घटना घडली आहे. या क्रिकेटपटूचा मृत्यूचा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

गरवारे मैदानात लक्की बिल्डर्स आणि यंग इलेव्हेन संघाचा सामना सुरु होता. अष्टपैलू क्रिकेटपटू इमरान पटेल हा लक्की बिल्डर्ससंघाकडून फलंदाजीसाठी उतरला होता. इमरानने सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर इमरानच्या छातीच्या डाव्या बाजूला दुखू लागलं. त्यामुळे इमरान छाती चोळू लागला.

इमरानला त्रास होऊ लागल्याने त्याने पंचाशी चर्चा केली. त्यावेळी विरोधी संघातील खेळाडूही त्याच्याजवळ आले. त्याला पुन्हा खेळण्यास विनंती करत होते. मात्र, त्याच्या छातीत खूप दुखत होते. त्याने मैदानातील पंच आणि इतर खेळाडूला त्याच्या त्रासाविषयी सांगितलं. त्यानंतर त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मैदानावर बाहेर जात असताना इमरात जमीनीवर कोसळला. त्यानंतर मैदानातील सर्वच खेळाडू त्याच्या दिशेने धावले. यानंतर इमरानला तातडीने रुग्णालयात दाखल केले. इमरानला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

'इमरानला कोणताही आजार नव्हता. त्याचं शरीर तंदुरस्त होतं. तो अष्टपैलू खेळाडू होता. त्याचं खेळावर खूप प्रेम होतं. त्याच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया इमरानचा मित्र नासीरने दिली. इमरानच्या मृत्यू पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. त्याची लहान मुलगी अवघ्या ४ महिन्यांची आहे. त्याच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय आला होता.

इमरानचा स्वत: क्रिकेट संघ होता. तो रिअल इस्टेटच्या व्यवसायात होता. तसेच ज्यूस शॉप देखील चालवायचा. काही महिन्यांपूर्वी सामनादरम्यान क्रिकेटपटू हबीब शेखचा मृत्यू झाला होता. त्याच प्रमाणे इमरानलाही मृत्यूने गाठले. हबीबला मधूमेहाचा आजार होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT