Crack in Railway Track Near Palghar : पश्चिम रेल्वेच्या पालघरमधील वैतरणा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या अप लाईनवरील रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याचं समजतेय. मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम झालाय. अनेक एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबा झालाय. वैतरणा रेल्वे स्थानकावर काही एक्स्प्रेस गाड्या खोळंबल्या आहेत.
सुदैवाने वेळीच रेल्वे रूळाला तडे गेल्याचं लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेय. यामुळे अप लाईन वरील गाड्यांचं वेळापत्रक खोळंबणार असल्याचे चित्र आहे. गुजरातकडून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत.
मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. गुजरातवरून मुंबईकडे येणाऱ्या अप लेनवरील रेल्वे ट्रॅकला तडे गेले आहेत, त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर देखील याचा परिणाम झाला. लोकलची वाहतूक थोड्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, सध्या अप लेन वरील गाड्या धीम्या गतीने मुंबईच्या दिशेने सुरू आहेत . वैतरणा रेल्वे स्थानकाजवळच या रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याची माहिती समोर आली असून सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. रेल्वे ट्रॅक बदलण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे . त्यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम होणार असून गाड्या उशिरा गेल्यास चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना आज पुन्हा एकदा लेट मार्ग लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.