Pune DSK Property
Pune DSK Property Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: डीएसकेंना मोठा दिलासा; ईडीने जप्त केलेल्या बंगल्यात जाण्यास न्यायालयाकडून परवानगी

Ruchika Jadhav

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ईडीने जप्त केलेल्या बंगल्यात जाण्यास डीएसकेंना परवानगी मिळालीये. ईडीच्या विशेष न्यायालयाकडून ही परवानगी देण्यात आली आहे.

ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने डीएसके यांचा बंगला जप्त केला होता. बंगल्यातील कागदपत्रे आणि उपकरणे ताब्यात मिळावी यासाठी डीएसकेंकडून अर्ज करण्यात आला होता. त्यावर जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करुन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाला दिले होते.

१२ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी डीएसके यांच्या बंगल्यातील लिलावामधील योग्य मालमत्तेची यादी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने तीन आठवड्यात तयार करावी असंही सांगितलं होतं.

डीएसके यांचं नेमकं प्रकरण काय?

बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी या दोघांवर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांये बुडवले तसेच फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. एकूण ३५ हजार गुंतवणुकदारांना गंडा घालण्यात आल्यावर त्यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर डीएसके यांच्या १९५ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.

डीएसके यांनी सदर मालमत्ता ठेवीदारांच्या पैशातून खरेदी केल्याचा, आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे ही मालमत्ता विकून गुंतवणुकदारांचे फसवणूक करून घेतलेले पैसे परत करावे, असं वकील ॲड. चंद्रकांत बिडकर यांनी आपल्या युक्तीवादात सांगितलं होतं. यावर सुनावणी घेताना विशेष न्यायालयाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

Rahu Gochar Effect: या राशींवर 2025 पर्यंत राहणार राहूची कृपा; प्रकृती चांगली राहील, खूप प्रगती होणार

HIV Vaccine : वैद्यकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी! HIV वरील व्हॅक्सिनची यशस्वी चाचणी

SCROLL FOR NEXT