Hotel Galaxy  Saam Tv
मुंबई/पुणे

Hotel Galaxy Fire Update : विमान उशीरा असल्याने हॉटेलमध्ये थांबले, पण लग्नाआधीच जोडप्याचा होरपळून मृत्यू

Mumbai Fire News : मृतांमध्ये एका जोडप्याचा तर गुजरातमधील व्यावसायिकाचा समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai News :

मुंबईतील सांताक्रुझ पूर्व येथील प्रसिद्ध गॅलेक्सी हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. रविवारी दुपारी हॉटेलच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली होती. मृतांमध्ये एका जोडप्याचा तर गुजरातमधील व्यावसायिकाचा समावेश आहे.

केनियाचे नागरिक रुपल कानजी धनजी (वय २५ वर्ष) आणि किशन प्रेमजी हलाई ( वय २८ वर्ष), व्यापारी कांतीलाल गोरधन वारा (वय ४८ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. रुपल धनजी आणि किशन हलाई यांचं लवकरच केनियामध्ये लग्न होणार होतं. टाईम ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Mumbai News)

तिघेही अहमदाबाद येथे आले होते. तेथून ते नैरोबीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र विमान उशीरा असल्याने त्यांना हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तिघेही सांताक्रूज येथील हॉटेल गॅलेक्सीच्या रुम नंबर ३०४ मध्ये होते.

मात्र त्याच दरम्यान हॉटेल गॅलेक्सीला आग लागली. या आगीत दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी आहेत. वाकोला पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. अद्याप एफआयआर दाखल करणे बाकी आहे. (Latest Marathi News)

पोलीस उल्लंघनांबद्दल अग्निशमन विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. आम्ही हॉटेलच्या कागदपत्रांची तपासणी करत आहोत. सुरक्षेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असं मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : संतापजनक! घरात घुसून तरुणीवर दोन वेळा बलात्कार; कुटुंबाला संपवण्याची धमकी

Maharashtra Live News Update: पिंपरी शहरातील वाकड इथे एका कारच्या गॅरेजला भीषण आग

Akshay Kumar: अक्षय कुमारचा १ फोटो काढायला पापाराझींना मिळतात 'इतके' रुपये; अभिनेत्यानेच सांगितला आकडा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक; चौघांचा जागीच मृत्यू

LPG Shortage: टंचाई नाही मग रांगा का? सिलिंडरच्या टंचाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा भडका

SCROLL FOR NEXT