नारायण राणे Saam Tv
मुंबई/पुणे

...म्हणून राणेंच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता करण्यास नगरसेवकाने केला विरोध

नारायण राणेंच्या बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्याला न. पं. चा निधी द्यायला नगरसेवक कन्हैया पारकरांनी केला विरोध.

अनंत पाताडे

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी कणकवली नगरपंचायत 25 रूपये खर्च करणार होती. मात्र आजच्या सभेत या रस्त्यासाठी हे पंचवीस लाख रुपये खर्च करण्यास नगरसेवक कन्हैया पारकर यांनी विरोध केला आहे.

हे देखील पहा -

कणकवली नगरपंचायतीची आज सर्वसाधारण होती. ही सभा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि इतर नगरसेवक उपस्थित होते. सभेमध्ये सर्वप्रथम नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या (Mayor Sameer Nalavade) मातोश्रींच्या निधनाबद्दल आणि कोरोनामुळे बळी पडलेल्‍या नागरिकांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहीली.

दरम्यान, आजच्या सभेमध्ये नारायण राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाचा (Land Acquisition) विषय चांगलाच गाजला. शहरातील नाथ पै नगर येथील राणेंच्या घराकडे जाणाऱ्या परिसरात अंतिम रेखांकन मंजूरी नसताना घरांना परवानगी देण्यात आल्यामुळे येथील रस्ते जमीन मालकांच्या नावे राहिले आहेत. हे रस्ते नगरपंचायतीकडे वर्ग करून घेण्यासाठी 25 लाख रूपये निधी देण्याबाबतचा मुद्दा सभेत चर्चेला आला असतानाच नगरसेवक पारकर यांनी जनतेचे पैसे राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खर्च करण्याला तीव्र विरोध दर्शविला. ते म्हणाले 'खासगी क्षेत्रातील रस्त्यासाठी कणकवली (Kankavali) शहरवासीयांच्या करातून जमा झालेला निधी खर्च करणे चुकीचे आहे.'

मात्र तेथील घरांना ग्रामपंचायतीच्या काळात परवानगी देण्यात आली होती त्‍यावेळी नियम पाहण्यात आले नव्हते. मात्र आता त्‍या त्रुटी आम्‍हाला दुरूस्त कराव्या लागत असल्यामुळे स्थानिक जमीन मालकांना भूसंपादनाचे पैसे देऊन तेथील रस्ता ताब्‍यात घ्यावा लागत असल्‍याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे (Deputy Mayor Bandu Harne) यांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT