Coronavirus smell recognize  saam tv
मुंबई/पुणे

Coronavirus : धक्कादायक! कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना वास ओळखता येईना! 80 टक्के रूग्णांवर दीर्घकालीन परिणाम

Covid19 Latest News : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची वास ओळखण्याची क्षमता बाधित होत असल्याचे तथ्य एका अभ्यासातून समोर आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Corona Latest Update: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची वास ओळखण्याची क्षमता बाधित होत असल्याचे तथ्य एका अभ्यासातून समोर आले आहे. पुण्यातील विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) डॉ. निक्सन अब्राहम यांनी केलेल्या संशोधनातून हा खुलासा झाला आहे. हे संशोधन ‘करंट रिसर्च इन न्यूरोबायोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशीत झाले आहे.

या संशोधनानुसार कोरोनातून बहुतेक रुग्ण बरे झाले, परंतु त्यातील अनेकांनी वास घेण्याची क्षमता गमावली आहे. डॉ. निक्सन यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या चमुने हे संशोधन केले. यासाठी बी.जे. वैद्यकीय (ससून) महाविद्यालयाची मदत घेण्यात आली. या संशोधनात सहभागी झालेल्यांचे चार प्रमुख गटांत विभागणी करण्यात आली. यात चा चार गटांत कोरोनाची लक्षणे नसलेले, विषाणूचे वाहक असलेले, बरे झालेले आणि निरोगी व्यक्तींची निवड करण्यात आली होती.

संशोधनादरम्यान काय आढळून आले?

या संशोधनादरम्यान शास्त्रज्ञांच्या चमूने प्रयोगशाळेतच ‘अल्पोक्सोमीटर’ विकसित केले. त्याद्वारे कोविडमधून बरे झालेल्या २०० रुग्णांची चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी संबंधितांना वास घेण्यासाठी १० प्रकारचे गंध दिले. या प्रयोगात सहभागींच्या वास घेण्याच्या क्षमतेचे निरीक्षण करण्यात आले. त्यातील ८० टक्के रुग्णांच्या वास ओळखण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले, तर काही रुग्णांना वास ओळखता देखील आला नाही. (Latest Marathi News)

संशोधनातून काय निष्कर्ष काढण्यात आला?

या संशोधनात प्रथम शास्त्रज्ञांनी विकसित केलेले ‘अल्पोक्सोमीटर’ अचूक असल्याचे सिद्ध झाले. तसेच लक्षणे नसलेले रुग्ण आणि लक्षणे नसलेल्या वाहकांमधील गंध शोधण्याच्या क्षमतेत फरक दिसून आला. याशिवाय कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांमधील घ्राणेंद्रीयाची हुंगण्याची क्षमता प्रभावीत झाल्याचे आढळून आले.

न्यूरल सर्किट्सवर विपरीत परिणाम

डॉ. अब्राहम यांच्या संशोधनानुसार, कोरोना संसर्गानंतर रुग्णांच्या न्यूरल सर्किट्सवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. ही बाब मेंदूशी संबंधित आहे. त्यामुळे याचा परिणाम बहुतांश रुग्णांवर होतो. कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेकांमध्ये वास ओळखण्याची क्षमता पुन्हा आली. परंतु असे अनेक रुग्ण आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारचा वास ओळखता येत नाही.

अभ्यासकांनी काय सांगितले?

पुणे येथील आयसर संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. निक्सन अब्राहम यांच्यानुसार, गंधाच्या संवेदनांचे इतके अचूक प्रमाणीकरण आम्ही विकसीत केलेल्या ऑल्फॅक्टोमीटरमुळे शक्य झाले. यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे घ्राणेंद्रीयांच्या संवेदी आणि संज्ञानात्मक दोन्ही कमतरतांबद्दल माहिती मिळू शकली. न्यूरोडीजनरेटिव्ह परिस्थिती आणि घ्राणेंद्रीयावर परिणाम करणाऱ्या संक्रमणांची तपासणी करण्यासाठी ही पद्धत आणखी विकसित करण्यात येईल, असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंचा पाटलांना मोठा धक्का! TDCC निवडणुकीत सहकार पॅनलचा दणदणीत विजय, मोठा उलटफेर

सौदी अरबमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

Pune Rainfall: पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं, ढगफुटीसदृश्य परिस्थिती; जनजीवन विस्कळीत, पाहा VIDEO

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

SCROLL FOR NEXT