Mumbai Dabbawala News Saam Tv
मुंबई/पुणे

Britain Prince Charles III: ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स तृतीय यांचा राज्याभिषेक, मुंबईचा डबेवाला भेटवस्तू म्हणून पाठवणार पुणेरी पगडी

Mumbai Dabbawala: लंडनमधील वेस्टमिंस्टर येथे होणाऱ्या या खास कार्यक्रमाला मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Priya More

निवृत्ती बाबर, मुंबई

Mumbai News: मुंबईचे डबेवाले (Mumbai Dabbawala) आणि ब्रिटनच्या राजघराण्याचं नातं खूपच खास असून ते सगळ्यानांच माहिती आहे. ब्रिटनच्या राजघराण्याशी मुंबईच्या डबेवाल्यांचे नातं 20 वर्षे जुनं आहे ब्रिटनच्या राजघरण्यात असलेल्या प्रत्येक खास कार्यक्रमांना मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रित केलं जातं. आता ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स तृतीय (Britains Prince Charles III ) यांचा राज्याभिषेक सोहळा (Coronation Program) होणार आहे.

येत्या 6 मे रोजी हा राज्यभिषेक सोहळा होणार आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. लंडनमधील वेस्टमिंस्टर येथे होणाऱ्या या खास कार्यक्रमाला मुंबईच्या डबेवाल्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मुंबईच्या डबेवाल्यांकडून प्रिन्स चार्ल्स यांना खास भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

प्रिन्स चार्ल्स तृतीय यांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त मुंबईच्या डबेवाल्यांनी राजा चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला यांच्यासाठी अनेक भेटवस्तू खरेदी केल्या आहेत. मुंबईच्या डबेवाल्यांच्या वतीने पुणेरी पगडी आणि वारकरी संप्रदायाची शाल भेट म्हणून देण्यात येणार आहे.

प्रिन्स चार्ल्स यांच्यामुळे मुंबईच्या डबेवाल्यांची जगभर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईच्या डबेवाल्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या लग्नाचे आमंत्रण देखील आले होते. 'आता त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देखील आम्हाला निमंत्रित करण्यात आले असून हा आमचा गौरवच आहे.', अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते विष्णू काळडोके यांनी दिली आहे.

तर एएनआय या वृत्तसंस्थेला मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'येत्या शनिवारी म्हणजेच 6 मे रोजी जवळच्या हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटण्याचाही कार्यक्रम असणार आहे. आम्ही शनिवारी जवळच्या रुग्णालयांमध्ये मिठाईचे वाटप करणार आहोत. प्रिन्स चार्ल्समुळे आपल्या समाजाला जगभरात ओळख मिळाली. आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आम्ही त्यांचा राज्याभिषेक साजरा करणार आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT