मुंबई : विदयार्थ्यांच शिक्षण रोखलं जाऊ नये. शिक्षण शिकत असताना फी संदर्भात शाळेची चर्चा केली होती. विदयार्थ्यांना शिकत असताना फी संदर्भात सामंजस्यपणा भूमिका घ्यावी लागणार आहे. यामध्ये CET परीक्षेला देखील १२ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली होती. यामध्ये कोणत्याही इतर मंडळाकडून सहकार्य मिळालं नाही. परंतु, विदयार्थ्यांच शिक्षण मात्र सुरु राहावं. तसेच विदयार्थ्यांच आरोग्य देखील यामध्ये महत्वाचं आहे.
हे देखील पहा-
श्रेणीवर्धनासाठी परीक्षा घेण्याचा विचार हा महत्वाचा होता. गुणांवर जर विदयार्थी जर समाधानी नसणाऱ्यांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यावेळेस महत्वाचे GR काढण्यात आले होते. या GR मध्ये वेगवेगळी गोष्टी नमूद करण्यात आले होते. परंतु, हे सांगतात एक आणि करतात एक असे म्हणले जात आहे. विदयार्थ्यांच्या शालेय फी कपाती निर्णयाबाबत मतभेद नाहीत. कोविड टॅग बॅचची भीती मनामध्ये बाळगू नये.
याकरिता शिक्षण मंत्र्यानकडून आव्हान केलं जात आहे. या सर्व शालेय गोष्टीवर कोरोनामुळे खूप वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या कोविड काळात अनेक शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले आहेत. त्या कामाबद्दल त्याची चर्चा देखील झाली आहे. फी कपातीबाबत तज्ज्ञांची चर्चा करण्यात आलेली होती. या शिक्षण क्षेत्रात बदलण्यासाठी काम सुरु आहे. यामध्ये शिक्षणाचा हक्क हा सर्वाना मिळायला हवा, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी म्हणाले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.