Mumbai Corona Update  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Corona Update : मुंबईकरांनो सावधान! आजची कोरोना आकडेवारी धास्ती वाढवणारी

मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ चौथ्या लाटेला आमंत्रण करणारी असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. काल मंगळवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊन नवे १२४२ रुग्ण आढळले होते. मात्र, आजच्या रुग्णसंख्येतही लक्षणीय वाढ झाल्याने (Corona new patients) कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा १७६५ वर पोहोचला आहे.

कालच्या आकडेवारीच्या तुलनेत आज दिवसभरात ५२३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या शून्य मृत्यूंची (corona death) नोंद झाली असली, तरी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळं मुंबईकरांची धास्ती आणखी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज कोरोनाच्या १७६५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीय. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा १०७२६१९ वर पोहोचला आहे. तर आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे कोरोना मृतांचा आकडा १९५६९ वर स्थिरावला आहे.

दरम्यान, मुंबईतील कोरोना बाधितांची आजपर्यंतची संख्या १०७२६१९ एवढी झाली आहे. तर कोरोनातून बरे झालेले रुग्णांची संख्या १०४६०५० वर पोहोचली आहे. तसेच मुंबईतील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ७००० झाली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

Chhattisgarh : ३६ किल्ल्यांची भूमी छत्तीसगड! भारतात लपलेला ऐतिहासिक खजिना, तुम्ही कोण-कोणते किल्ले पाहिलात?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचे भाजप कार्यालयावर आंदोलन

Good News : LPG दरात झाली मोठी घट, ऑटो चालकांना मोठा दिलासा, पाहा आता किती रूपयांना मिळणार?

पांढरे केस होतील काळे! तुरटी आणि आवळ्याचा 'हा' सोपा उपाय ठरेल फायदेशीर

SCROLL FOR NEXT