Siddhesh Kadam Yuvasena News Saam TV
मुंबई/पुणे

रामदास कदमांच्या मुलाच्या पदावरुन युवासेनेच्या बैठकीत वाद; वरुण सरदेसाईंना विभाग प्रमुखांनी विचारला जाब

सिद्धेश कदम यांना अद्याप पदावर ठेवल्याने शिवसेनेचे इतर पदाधिकारी नाराज आहेत.

Jagdish Patil

निवृत्ती बाबर -

मुंबई: युवासेनेची (Yuva Sena) काल एक बैठक पार पडली मात्र या बैठकीमध्ये सिद्धेश कदम युवासेनेच्या कार्यकारणीत असल्याच्या मुद्यावरुन वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) हे युवासेनेच्या पदावर अजून का? आहेत असा जाब वरुण सरदेसाई (Varaun Sardesai) आणि सूरज चव्हाण यांना विभाग प्रमुखांनी जाब विचारला आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून रामदास कदम (Ramdas Kadam) हे शिंदे गटाच्या बाजूने बोलत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आहेत. शिवाय शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे काहीही योगदान नाही. केवळ पुत्रप्रेमापोटी आदित्य ठाकरेंना मंत्रीपद दिल्याचा आरोप देखील रामदास कदमांनी केला होता.

पाहा व्हिडीओ -

त्यामुळे ठाकरेंवर सतत आरोप करत त्यांची बदमानी करणाऱ्या रामदास कदम यांच्या मुलाला अजून युवासेनेच्या पदावर का ठेवलं आहे? असा प्रश्न विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि आमदार विलास पोतनीस यांनी विचारल्यामुळे बैठकीतलं वातावरण तापलं होतं.

सिद्धेश कदम हे बंडखोर आमदार योगेश कदम यांचे बंधू तर रामदास कदम यांचे ते चिरंजीव आहेत. शिवाय सिद्धेश कदमांची हकालपट्टी करण्याची सातत्याने मागणी करुन देखील सूरज चव्हाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

सिद्धेश कदम यांना अद्याप पदावर ठेवल्याने शिवसेनेचे इतर पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे आता सिद्धेश कदमांची दसरा मेळावापूर्वीच युवासेनेतून हाकालपट्टी अटळ असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळी गिफ्टसाठी हट्ट, मालकाकडून शिवीगाळ करत अमानुष मारहाण, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Today's Panchang: आज कार्तिक शुक्ल तृतीया; अनुराधा नक्षत्राचा योग देणार शुभ फल, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Shocking Death : NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, जलतरण सरावादरम्यान भयंकर घडलं; पुण्यात खळबळ

IRCTC New Rule: आता रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही; IRCTC मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT