Ravi Rana- Navneet Rana Saam TV
मुंबई/पुणे

राणा दाम्पत्याकडून न्यायालयाचा अवमान?; शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत

आता रवी राणा (Ravi Rana), नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या वक्तव्या नंतर शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राणा दाम्पत्याला १२ दिवसांनी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केल्यानंतर त्यांना माध्यमांशी बोलायला बंदी घातली होती. आता रवी राणा (Ravi Rana), नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या वक्तव्या नंतर शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. दाखल गुन्ह्यात जामीन दिल्यानंतर कोर्टाचा अवमान राणा दाम्पत्यानी केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या मुद्यावर न बोलण्याच्या अटीवर राणा दाम्पत्याना जामीन देण्यात आला होता. राणा दाम्पत्यानी हनुमान चाळीसा, मुख्यमंत्र्यांवरती आरोप करत कोर्टाचा अवमान केला असल्याचा दावा शिवसेनेने दिला आहे.

नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेत शिवसेने विरोधात प्रचार करणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. आता त्याला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. नवनीत राणा विषय संपला होता. आता त्या काहीही बोलू लागल्या आहेत. त्यांनी शिवसेनेविषयी वक्तव्य केले, काय झाले माहीत आहे ना? राणा दाम्पत्यांनी मीडिया समोर बोलत कोर्टाचा अवमान केला आहे.

कोर्टात पुन्हा काय ते होईल असे पेडणेकर म्हणाल्या आहेत. नवनीत राणा यांनी मुंबईत महापालिका निवडणुकीत येऊनच दाखवावे. कोणाला आव्हान देताय तुम्ही? हॉस्पिटलमध्ये असतांना जे भेटायला गेले त्यातून त्या कोणासाठी काम करत होत्या हे जगाला कळले आहे. भाजपच्या प्रचारासाठी यायचे तर यावे असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT