"राज ठाकरे कोणाचंही न ऐकणारे नेते; त्यांच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा नाही"

'राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, धोका दिला आहे, त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार राज यांना नाही.'
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV

सांगली : राज ठाकरे (Raj Thackeray) कोणाचंही न ऐकणारे नेते आहेत. भाजप नेत्यांचा त्यांना पाठिंबा नाही. जे आरोप केले जातात ते चुकीचं असून, राज यांना वाटलं असेल हिंदुत्व मुद्दा घेतला तर त्यांचा फायदा होईल, असं वक्तव्य केंद्रीय समाजिक राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केलं आहे. ते आज सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, धोका दिला आहे, त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार राज यांना नाही. अंगावर भगवे वस्त्र धारण केली हे चांगलंच आहे. पण राज ठाकरे यांनी शांततेची भूमिका मांडावी. त्यांनी पक्ष स्थापन करताना सर्व रंगाचे झेंडे आणले होते. पण आता भगवा रंग परिधान केला असून त्यांनी शांतता पसरावी पण भगव्या रंगाच्या विरोधात त्यांचे काम सुरू असल्याची टीकाही रामदास आठवले यांनी केली.

तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांबरोबर मी होतो. पण त्यांचा सिम्बॉल घेऊन मी निवडणूक लढवली नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सिम्बॉल घेऊन निवडणूक लढवणार असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं.

हे देखील पाहा -

शिवाय महाविकास आघाडीचे सरकार जनतेला न्याय देण्यासाठी अपयशी ठरले आहे. या सरकारमध्ये नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्याचं काम करत असतात. या सरकारमध्ये काँग्रेसला (Congress) डावललं जातंय, नाना पाटोलेंना विनंती करणार आहे की, सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आमची सरकार बनवण्याची तयारी आहे. ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे याला माझा पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन जातात. त्यामुळे त्यांनी राज्याच्या विकासात भर पाडली असही ते म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे कोणाचंही न ऐकणारे नेते आहेत. भाजपचा नेत्यांचा त्यांना पाठिंबा नाही. जे आरोप केले जातात ते चुकीचे आहेत. त्यांना वाटलं असेल हिंदुत्व मुद्दा घेतला तर त्याचा फायदा होईल असं आठवलेंनी स्पष्ट केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com