nana patole and eknath shinde  saam tv
मुंबई/पुणे

एसटी महामंडळाला 10 कोटी रुपये दिल्यावरून नाना पटोलेंनी साधला शिंदे गटावर निशाणा; म्हणाले ,'अर्थात आता ED...'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Nana Patole News : शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या संपूर्ण राजकीय इतिहासात मुंबईत पहिल्यांदा दोन दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाने जय्यत तयारी केली आहे. दोन्ही गटाने दसरा मेळाव्याला समर्थकांची गर्दी जमवण्यासाठी मोठी तयारी केली आहे. शिंदे गटाने चक्क शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी १० कोटी रुपये रोख भरले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी निशाणा साधला आहे.

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने राज्यातील विविध भागातून एसटी बसेस तसेच बसेसमधून कार्यकर्ते आणले जात आहेत .यासाठी शिंदे गटाने एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपये भरले आहेत. तसेच शिंदे गटाने दिलेल्या नोटा मोजण्यासाठी एसटी महामंडळाला दोन दिवस लागल्याचे वृत्त देखील समोर आले आहे.

शिंदे गटाकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली ? त्यांना हा पैसा कोणी दिला ? असे नानाविविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकारावरून नाना पटोले यांनी ट्विट करत शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

नाना पटोले ट्विट करत शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. 'शिंदे गटाने त्यांच्या मेळाव्यासाठी रू. 10 कोटी कॅश देऊन 1700 एसटी बसेस ठरवल्याच्या बातम्या येत आहेत. अर्थात आता ED या प्रकरणाची चौकशी करणार नाहीच. कारण त्यांच्यासाठी हे सगळं 'ओक्के मंधी हाय !!'

दरम्यान, शिंदे गटाने एसटी मंडळाला १० कोटी रुपये दिल्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस ईडी व आयकर विभागाने याची दखल घेऊन चौकशी करावी, या मागणीसाठी आक्रमक झाली आहे. तसेच चौकशी करण्यास टाळाटाळ केली तर काँग्रेस पक्ष हा ईडी व आयकर विभागाकडे रितसर तक्रार करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked raisins: 30 दिवस रोज सकाळी खा पाण्यात भिजवलेले मनुके; होणारे फायदे वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Maharashtra News Live Update: १८,६०० फूट उंचीवर भारतीय लष्कराच्या वैमानिकांचा थरारक पराक्रम; एकाच स्किडवर लँडिंग करत जखमीची केली सुटका

टिटवाळा स्थानकात १५ दिवसांचा मोठा मेगाब्लॉक! १५ दिवस लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार; अनेक गाड्या रद्द

Bank Holidays 2026: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँकांना सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी

Weekend Getaway : मुंबईकरांनो, पावसाळ्यात One Day Trip साठी हे ठिकाण आहे एकदम परफेक्ट!

SCROLL FOR NEXT