Congress First Candidate List Saam Tv
मुंबई/पुणे

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

काँग्रेसची ४८ उमेदावारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे प्रफुल गुडधे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आज गुरुवारी शरद पवार गटाने पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता काँग्रेसने विधानसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने विधानसभेसाठी ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली. काँग्रेसने पहिली यादी जाहीर केल्याने आणखी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीचं २७० जागांवर सहमती झाली आहे. त्यानंतर पुढील जागांसाठी मित्रपक्षांशी चर्चा करणार होते. ठाकरे गटाने पहिल्यांदा ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आज शरद पवार गटाने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आता काँग्रेसने ४८ उमेवदावारांची यादी जाहीर केली आहे.

महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांनी एकूण १५८ उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये अद्याप काही जागांवर तिढा कायम आहे. या जागांवरील तिढा मिटण्याची शक्यता आहे. त्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीने आतापर्यंत १८२ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने ९९, शिंदे गट ४५ आणि अजित पवार गटाने ३८ जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत.

नागपूरमधील एक मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला

नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता होती. पूर्व नागपूर आधीच शरद पवार गटाकडे गेला आहे. काँग्रेसच्या वाट्यातील पाच मतदारसंघांपैकी काँग्रेसने आज चार मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र दक्षिण नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये जोरदार वाद पेटले होते. ती जागा अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विदर्भातील जागांबद्दलचा वाद अजूनही पूर्णपणे संपुष्टात आलेला नाही हेच या यादीवरून दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT