Congress Protest Saam Tv
मुंबई/पुणे

Congress Protest: आंदोलन राजकीय पक्षाचे, त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना, पेडररोड, नेपेन्सी रोड, हाजीहली परिसरात मोठी वाहतूक कोंडी

भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील मलबार हिल परिसरातील सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आंदोलन करणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: काँग्रेसमुळे कोरोना वाढला.., पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर काँग्रेसनं आंदोलनं करण्यास सुरुवात केली. आज सोमवारी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील मलबार हिल परिसरातील सागर बंगल्याबाहेर काँग्रेस आंदोलन करणार आहे. मात्र, यामुळे सामान्य मुंबईकरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे (Congress protest against bjp in front of Devendra Fadnavis House In Mumbai people are suffering from traffic jam).

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आता भाजप (BJP) विरुध्द काँग्रेस (Congress) वाद चिघळला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) सामना करावा लागत आहे. भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने पेडररोड, नेपेन्सी रोड, हाजीहली परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. फडणवीसांच्या बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच, पोलिसांचाही मोठा फौजफाटाही तैनात आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT