Varsha Gaikwad Saam tv
मुंबई/पुणे

Varsha Gaikwad: 'मुंबईमध्ये आमच्या जागा...'; आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांचं मोठं वक्तव्य

सूरज सावंत

varsha Gaikwad News: राज्यातील राजकीय पक्षांना आगामी महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच मुंबई महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'मुंबईमध्ये आमच्या जागा वाढवण्यावर भर देऊ, असं मोठं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. (Latest Marathi News)

वर्षा गायकवाड यांनी आज मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर आणि चैत्यभूमी येथे भेट दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'काँग्रेसने दिलेल्या संधीच मी स्वागत करते. मला पेरेंट बॉडीची पोस्ट देण्यात आली. लडकी हूँ, लड सकती हूँ, असं प्रियंका गांधी म्हणतात. ते सत्यात उतरवत आहे. काँग्रेने महिलांना पुढे नेण्याचं काम केलं. या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं. मात्र महिलांना कोणतीही संधी नाही'.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य करताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'मुंबईत काँग्रेस पुढे नेऊ. आम्ही आमच्या श्रेष्ठींना सांगू. संघटना मजबूत करू. मुंबईमध्ये आमच्या जागा वाढवण्यावर भर देऊ'.

तर देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना गायकवाड म्हणाल्या, 'नजीकच्या सर्व निवडणुकांमध्ये लोकांनी काँग्रेसला लोकांनी भरभरून मतदान केलं. पोटनिवडणूक कर्नाटक या सगळ्या ठिकाणी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. आघाडी एकत्र लढली तर त्याचा परिणाम चांगला होईल. आम्ही सोबत लढल्यानंतर आम्हाला कायमच फायदा झाला आहे. त्यामुळे फडणवीस यांना यश मिळेल असं वाटत असेल तर तसं होणार नाही'.

'श्रीकांत शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांवर भाष्य करताना गायकवाड म्हणाल्या, 'खासदार श्रीकांत शिंदे नाराज आहेत. तर त्यांनी साथ सोडून द्यावी. त्यांचा तडजोडीचा संसार आहे'.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नांदेडमधील भाषणावर भाष्य करताना गायकवाड म्हणाल्या, 'अमित शाह यांनी महागाईवर बोलावं. पेट्रोलच्या किंमतीवर बोलावं. मूलभूत प्रश्नांवर बोललं पाहिजे. महागाई असेल त्यानंतर पेट्रोल दरवाढ स्त्रियांची सुरक्षितता यावर अमित शाह यांनी बोललं पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्था लयाला गेली आहे, त्यावर शाह यांनी बोललं पाहिजे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रूपाली चाकणकर यांच्याप्रती केलेली कौतुकाची पोस्ट अजित पवारांनी केली डिलीट

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

SCROLL FOR NEXT