Bhai Jagtap - Saam TV
मुंबई/पुणे

काँग्रेसचे भाई जगताप मुंबईत शिवसेनेला आणताहेत अडचणीत

राज्यात महाविकास आघाडी सरकार मध्ये असलेल्या काँग्रेसने मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला मात्र अडचणीत आणण्यासाठी पाऊले उचलली आहेत

रामनाथ दवणे

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी Maha Vikas Aghadi सरकार मध्ये असलेल्या काँग्रेसने मुंबई Mumbai महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला Shivsena मात्र अडचणीत आणण्यासाठी पाऊले उचलली आहेत. मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत असे सांगत मुंबई काँग्रेस Mumbai Congress अध्यक्ष भाई जगताप Bhai Jagtap यांनी विविध मुद्द्यांवर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेत आज मुंबई महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. Congress Mumbai Chief Bhai Jagtap Criticism on Shivsena in BMC

मालमत्ता कर वाढ,मुंबई महापालिका प्रभागांची फेररचना,बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीसाठी अनुदान,नालेसफाई या मुद्यांवर शिवसेनेवर आरोप करत जगताप यांनी सेनेच्या अडचणीत वाढ केली आहे. मुंबईमहानगर पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी काँग्रेस ने करत आपली वोट बँक वाढविण्यासाठी शिवसेनेला निशाणा बनवले आहे.

मालमत्ता कराबाबत बोलताना जगताप म्हणाले, "बीएमसीच्या मालमत्ता कराच्या प्रस्तावाला आम्ही विरोध केला होता. रेडिरेकनरचा अर्थ मागच्या दरवाजाने कर वाढ असा होतो. आम्ही त्याला विरोध केल्यानंतर हा प्रस्ताव फेटाळला याबाबत धन्यवाद . २०२५ पर्यत हा प्रस्ताव असाच स्थगित ठेवावा, अशी आमची मागणी आहे.''

जगताप म्हणाले, "नालेसफाई बाबतीत ३१ मे ला पत्रकार परिषद घेऊन शहरात १०० टक्के तर उपनगरात ८० टक्के नालेसफाई केली अशी असा सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही दौरा केला त्यात कळले की २० ते २५ टक्के सुद्धा नालेसफाई झाली नव्हती. त्यानंतर मुंबई तुंबली हे आपण पाहिले. नालेसफाईसाठी १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मग हे पैसे कुठे गेले कसे खर्च झाले कुठे खर्च झाले? हे प्रश्न आहेत. यामध्ये जे जबाबदार कंत्राटदार असतील त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही करतो. नालेसफाईबाबतीत वरिष्ठ पातळीवर कारवाई करून जो अहवाल जाहीर करा, अशीही आमची मागणी आहे,'' पाऊस फार पडला नाही तरी खड्डे मात्र पडलेत आता पाऊस पडल्यावर खड्यांचं काय होणार ? किती होणार पावसाळ्याच्या काळात जीव घेणारा खड्डे हा विषय पुन्हा एकदा समोर आलाय, असेही जगताप म्हणाले.

आम्ही मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष आहोत. मुंबईसाठी आम्ही आमची भूमिका मांडत आहोत, असाही दावा जगताप यांनी केला. ''बीईएसटीने कोरोना काळात वाहतूक व्यवस्था दिली. बीएसटी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या ग्रॅच्युईटीचे साधारणपणे ४०६ कोटी रुपये दिले गेलेले नाहीत. आम्ही याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले आहे, ज्या लोकांनी मुंबईकरांची सेवा दिली त्यांचे पैसे रोखले आहेत,'' अशीही टीका जगताप यांनी केली.

महापालिका निवडणुकीसाठी वाॅर्ड फेररचनेबाबत जगताप म्हणाले, "वॉर्डची पुनर्रचना हा सुद्धा कळीचा मुद्दा होता. या निर्णयाच्या प्रक्रियेला बगल देऊन हा निर्णय घेतला होता, हा मुद्दा आम्ही त्यावेळी मांडला होता. ४५ प्रभागांमध्ये विशिष्ट समुहाचे मतदार वेगळे केले गेले. त्याबाबत आम्ही प्रशासनासमोर आमची बाजू मांडू. भाजप ला मदत होईल अशाप्रकारे वॉर्ड फेररचना केली होती. त्याचा फायदा त्यांना झाला होता. म्हणून त्यांच्या नगरसेवकांची संख्या ३१ वरुन ८२ वर गेली.''

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT