Bhai Jagtap News Saam tv
मुंबई/पुणे

Bhai Jagtap News: काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर भाई जगतापांची पहिली प्रतिक्रिया;म्हणाले...

'मला आंनद आहे की वर्षा गायकवाड या मुंबई अध्यक्ष झाल्या आहेत, अशा शब्दात भाई जगताप यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

भूषण शिंदे

Mumbai News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी काँग्रेस नेतृत्वाने वर्षा गायकवाड यांची निवड करत भाई जगताप यांची पदावरून उचलबांगडी केली आहे. या निर्णयाचे भाई जगताप यांनी स्वागत केले आहे. पक्षाने काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावरून हटविल्यानंतर भाई जगताप यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'मला आंनद आहे की, वर्षा गायकवाड या मुंबई अध्यक्ष झाल्या आहेत, अशा शब्दात भाई जगताप यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची निवड झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदावर आमदार वर्षा गायवाड यांची निवड झाल्यानंतर आमदार भाई जगताप यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर प्रतिक्रिया दिली. भाई जगताप म्हणाले, 'मला आनंद आहे की, वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा झाल्या आहेत. एका महिलेला अध्यक्ष केल्याबद्दल आनंद आहे. कृपया आमच्या बहीण-भावामध्ये भांडण लावू नका. वर्षाताई सारख्या काँग्रेसनिष्ठ व्यक्तीला मुंबई अध्यक्षपद देण्यात आले आहे, याचा आनंद आहे'.

'मला याची कल्पना होती, माहीत होत की मुंबई अध्यक्षपद बदलण्यात येत आहे. या पदासाठी अनेक नावं काँग्रेस समोर होती, पण वर्षा गायकवाड या योग्य आहेत. वर्षा गायकवाड चार वेळा आमदार राहिल्या आहेत.. प्राध्यापिका आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांसोबत काँग्रेससाठी काम केलं आहे, असे भाई जगताप पुढे म्हणाले.

दरम्यान, यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर देखील भाई जगताप भाष्य केलं. 'स्वतःची जाहिरात करण्यासाठी हे सरकार मुंबई महापालिका , राज्य सरकार आणि करदात्यांचा पैसा वापरतात. शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारातून पैसे कापतात. अधिवेशनामध्ये ज्या काही घोषणा केल्या शेतकऱ्यांसाठी असतील किंवा अजून काही असतील त्या कोणाच्या आधारावर केल्या? अशाच पद्धतीने कष्टकऱ्यांचे लोकांचे पैसे कापून करणार आहात का? असा सवाल भाई जगताप यांनी केला आहे.

भाई जगताप पुढे म्हणाले, 'ही कुठली पद्धत..? याआधी असे झालेले नाही.याआधी दुष्काळ किंवा आणखी काही मोठे प्रश्न असतील. त्यावेळी प्रवासी टॅक्स वाढवून अशा पद्धतीने करत होते. याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींचे सरकार कष्टकऱ्यांना लुटण्याचे काम करत आहे. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे सरकार सुद्धा काम करत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Massage Parlour Fraud : मसाजाच्या हौसेने वकिलाचे खाते झालं रिकामं, नग्न अवस्थेत व्हिडिओ काढून लुबाडलं, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Maharashtra Dasara Melava Live Update : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार-अजित पवार

Pune : पुण्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांना अटक, खंडणी प्रकरणात मोठी कारवाई

Ranapati Shivray Swari Agra: 'रणपति शिवराय- स्वारी आग्रा'; शिवराज अष्टकातील सहावे चित्रपुष्प लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Chanakya Niti: नवरा-बायकोने या ३ गोष्टी लक्षात ठेवा, संसार होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT