Congress on PM Narendra Modi Saam tv
मुंबई/पुणे

Congress on PM Narendra Modi: लाल किल्ल्यावरील भाषण पंतप्रधानांचे नव्हते तर...; काँग्रेसने केला गंभीर आरोप

Congress on PM Narendra Modi: नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरून भाषण ते प्रंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून भाषण केला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे

Nana Patole News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडंल. 'नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरून भाषण ते प्रंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून भाषण केला, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. (Latest Marathi News)

उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा गौरव यात्रेच्या समारोप प्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले बोलत होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम आणि उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाच्या वतीने भव्य तिरंगा गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने कार्यकर्ता व पदाधिकारी या यात्रेत सामील झाले होते.

या यात्रेत गोरेगाव पश्चिम अण्णाभाऊ साठे मैदान येथून सुरू होऊन अंधेरी पश्चिमेकडील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक भवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समाप्त झाली. या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड देखील सामील झाल्या होत्या.

दरम्यान, कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील दिले. नाना पटोले म्हणाले, 'भारताला हुकूमशाहीपासून वाचवायचा असेल, तर 15 ऑगस्ट 2024 ला लाल किल्ल्यावर इंडिया आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र दिन साजरा झाला पाहिजे'.

तसंच आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जे भाषण झाले, ते देशाचे पंतप्रधान म्हणून नाही तर आरएसएसचे प्रचारक म्हणून त्यांनी भाषण केल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानामुळे पशुपालक सापडले संकटात

उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला, राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार, नेमकं काय म्हणाले?

Famous Actress Divorce : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट, २ मुलांच्या आईच्या आयुष्यात वादळ

IPL सुरू असतानाच टीम इंडियासाठी आली बॅड न्यूज; इंग्लंड, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांना २ खेळाडू मुकणार

Side Effects Of Eating Non-Veg In Summer: उन्हाळ्यात नॉन व्हेज खावे की नाही? किती प्रमाणात खावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT