Congress leader Baba Siddique News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Politics : मुंबईत काँग्रेसला खिंडार? बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता

Congress leader Baba Siddique News : सध्या तरी मी इतर पक्षात जाण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. जर काही घडत असेल तर मी अधिकृतरित्या सांगेल, असं बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

प्रविण वाकचौरे

सुनील काळे

Mumbai News :

मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर आता काँग्रेस नेते माजी मंत्री बाबा सिद्धीकी आणि काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी हे देखील काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. (Latest News)

बाबा सिद्धीकी आणि झिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच त्यांचा अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याची माहितीही मिळत आहे. बाबा सिद्धीकी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार गटाकडून राज्यसभेवर अल्पसंख्यांक चेहरा पाठवला जाऊ शकतो, अशी चर्चा होती. त्यामुळे अजित पवार गटाकडून राज्यसभेवर जाणारा अल्पसंख्यांक चेहरा बाबा सिद्दीकीच आहेत का? अशी चर्चाही आता सुरु झाली आहे. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेसला मुंबईत मोठं खिंडार पडून शकतं. काँग्रेसचा हक्काचं मतदारसंघ हातून जाऊ शकतो. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले बाबा सिद्दीकी?

सध्या तरी मी इतर पक्षात जाण्याचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. जर काही घडत असेल तर मी अधिकृतरित्या सांगेल. मात्र राजकारणात काहीही होई शकतं, असं बाबा सिद्धीकी यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Latest Marathi News)

कोण आहेत बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाकडून वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा ते आमदार होते. याशिवाय त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि FDA राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. 2000 ते 2004 दरम्यान ते मुंबई म्हाडा बोर्डाचे अध्यक्ष देखील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

Skin Care : त्वचेवर दिवसातील कोणत्या वेळेस कोरफडीचे जेल लावावे? जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT