Atul Londhe Politician, Eknath Shinde News, BJP Maharashtra News
Atul Londhe Politician, Eknath Shinde News, BJP Maharashtra News Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासारखी; अतुल लोंढेंची मुख्यमंत्र्यांसह भाजपवर बोचरी टीका

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: राज्यात सत्तांतर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, मात्र अजूनही नव्या सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला आहे. राज्यात एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं अडलं आहे तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे (Flood In Maharashtra) अनेक जिल्ह्यात आलेल्या पूरानं थैमान घातलं आहे. याबाबत कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. भाजप आणि शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासाठी केली आहे अशी बोचरी टीका अतुल लोंढेंनी केली आहे. (Atul Londhe Politician)

हे देखील पाहा -

कॉंग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात भाजप प्रणित शिंदे सरकार येऊन १५ दिवस झाले पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. उपमुख्यमंत्र्यांनाही खाते दिले नाही. राज्यात पूरस्थितीमुळे १०० हून अधिक बळी गेले आहेत. भाजप आणि शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासाठी केली आहे" असं ट्विट करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे. (General Secretary And Chief Spokesperson Of Maharashtra Congress Atul Londhe)

दरम्यान, एकीकडे लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) करण्याचा नव्या सरकारचा प्रयत्न आहे, मात्र खातेवाटपाबाबत सरकारमध्ये असलेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटात (Eknath Shinde) खलबतं सुरू आहेत. जी ३ खाती शिंदे गटाला हवी आहे ती ३ खाती भाजपलाही हवी आहेत त्यामुळे या तीन खात्यांवरुन मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं अडलं आहे. (Eknath Shinde News)

या तीन खात्यांवरुन अडलंय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं घोडं

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटा ऊर्जा खातं, सार्वजनिक बांधकाम विभाग खातं आणि वैद्यकीय शिक्षण खांत अशी तीन खाती हवी आहेत, मात्र या तीन खात्यांसाठी भाजपही आग्रही आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ही तिन्ही खाती भाजपकडे होती, त्यामुळे ही खाती पुन्हा आपल्याकडे रहावी अशी भाजपची इच्छा आहे. मात्र, नगरविकास खातं वगळता शिंदे गटाला इतर कोणतंही महत्वाचं खातं मिळालं नाही, त्यामुळे आता ऊर्जा खातं, सार्वजनिक बांधकाम खातं आणि वैद्यकीय शिक्षण खातं ही तिन्ही खाती आपल्याला मिळावी अशी शिंदे गटाचीही मागणी आहे. तसेच ठाकरे सरकारच्या काळात ही खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडे होती, आता ही खाती आपल्याला मिळावी अशी भाजपची मागणी आहे. मंत्रिपदाच्या या रस्सीखेचात भाजप आणि शिंदे गटात सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा आहे, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही गोंधळ कायम आहे. (Latest Politics News)

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: पिकलेली की कच्ची कोणती केळी आहे आरोग्यासाठी फायदेशीर?

kitchen Hacks: लंचबॉक्समध्ये दिलेले सफरचंद काळे पडतेय? मग या टिप्स करा फॉलो

Elvish Yadav : एल्विश यादवच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल

Special Report : Hatkanangale Lok Sabha | हातकणंगलेत होणार तिरंगी लढत

Uday Samant News | उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT