bacchu kadu, ravi rana, eknath shinde, amravati
bacchu kadu, ravi rana, eknath shinde, amravati saam tv
मुंबई/पुणे

Congress : रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी व्हावी; काँग्रेस नेत्याची मागणी

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून कोण किती खोके घेऊन गुवाहाटीला गेले होते?, याची ईडी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. (Bacchu Kadu Latest News)

या संदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू हे पैसे घेऊन गुवाहाटीला गेले होते असा आरोप केला आहे. राज्यात सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ५०-५० कोटी रुपये घेऊन आमदार गुवाहाटीला गेले होते अशी चर्चा राज्यभरात सुरू होती. त्यावर रवी राणा यांनी शिक्कामोर्तबच केले आहे.

रवी राणा हे आमदार या संवैधानिक पदावर असून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या एका पत्रावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्याकडून चौकशा झाल्या, त्याच पद्धतीनं आता सत्तांतराच्या काळात कोणी कोणाला किती पैसे दिले-घेतले गेले याचीही ईडी, सिबीआय, इन्कम टॅक्स यांच्यामार्फेत चौकशी झाली पाहिजे. (Political News)

त्यातून राज्यातील सत्तांतराचे सत्य बाहेर येईल व अनेकांचे बुरखे फाटतील. या संस्थांनी जर या प्रकरणाची चौकशी केली नाही तर त्यांच्या निष्पक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि त्या निष्पक्ष नसून सत्ताधा-यांच्या इशा-यावर फक्त विरोधकांना टार्गेट करत आहेत हे स्पष्ट होईल, असे लोंढे म्हणाले.

रवी राणांचे आरोप काय?

गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताहेत. किराणा वाटपावरून बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर टीका केल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. इतकंच नाही तर, गुवाहाटीला जाऊन बच्चू कडू यांनी कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोपही राणांनी केला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi News: अवघ्या एका रुपयात लग्न.. शिर्डीतील कोते दाम्पंत्याचा आदर्श उपक्रम; २४ वर्षात केले २३०० मुलींचे कन्यादान

Shukrawar Upay: शुक्रवारी महिलांनी करू नका ही कामे, माता लक्ष्मी होईल नाराज

Abijeet Patil News | अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरची जप्ती टळली, नुकताच केला होता भाजपमध्ये प्रवेश

Yawal Fire News : प्राचीन श्रीराम मंदिरासह बँकेला आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Sony AC : रखरखत्या उन्हात रस्त्यावरून जातानाही मिळणार एसीची हवा; कसं? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT