Governor Bhagat Singh Koshyari Saam TV
मुंबई/पुणे

यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राचा सातत्याने अवमान; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसची टीका

काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे.

काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं असून या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. काल राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत आज जे.पी. रोड, अंधेरी पश्चिम येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान राज्यपालांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं.

राज्यपाल म्हणाले, 'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही. तसंच मुंबई आणि ठाण्याच्या (Mumbai and Thane) विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय असल्याचंही राज्यपाल या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्यावर सावंत यांनी ट्विटद्वारे टीका केली आहे.

'राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे.या राज्यपालांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला.' असं ट्विट करत सावंत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील राज्यपालांनी महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children Day Meaning: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

नवरा लटकलेला, तर पत्नी अन् ३ मुलांचे मृतदेह खाटेवर; हृदयाचा थरकाप उडवणारी घटना

Children's Day Special: बालदिनानिमित्त तुमच्या मुलांसोबत आज पाहा हे खास चित्रपट

Bihar Election Result Live Updates: दिग्विजय सिंह यांनी सांगितले काँग्रेसच्या पिछाडीचे कारण

IND vs SA VIDEO: लेगमध्ये त्याचा कॅच मिळतो...! टेम्बा बवुमासाठी पंतने आपल्या स्टाईलने लावली फिल्डींग; पुढच्याच बॉलला गेली विकेट

SCROLL FOR NEXT