Shivsena Vs Congress Saam TV
मुंबई/पुणे

BMC: 'राज्यात एकत्र असलो तर पालिकेत विरोधी बाकावर'; प्रभाग आरक्षणावरुन काँग्रेस आक्रमक

'काही विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी प्रभाग पुनर्रचना केली असून, काँग्रेसला त्रास देण्यासाठी हा शिवसेनेचा डाव तर नाही ना?'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : मुंबई महापालिका (BMC) निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांमध्ये धुसफुस सुरु झाली आहे. वार्ड आरक्षणाबाबत काँग्रेसमध्ये नाराजी असून याच मुद्द्यावरुन काँग्रेसने (Congress) आक्रमक भूमिका घेतली आहे.

काँग्रेस नेते भाई जगताप यांनी प्रभाग पुनर्रचनेच्या मुद्यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. काही विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी प्रभाग पुनर्रचना केली असून, काँग्रेसला त्रास देण्यासाठी हा शिवसेनेचा डाव तर नाही ना? असा सवाल भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, 'महापालिका आरक्षण सोडत झाली, ही एक प्रक्रिया आहे, त्याची मार्गदर्शक तत्व आहेत. मात्र, काही विशिष्ट लोकांना खुश करण्यासाठी प्रभाग पुनर्रचना केल्याचे त्यावेळेही सांगितले होते. तसंच शिवसेनेचा डाव तर नाही की, काँग्रेसला अधिक त्रास होईल असं म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही.' असं जगताप म्हणाले.

हे देखील पाहा -

तसंच दक्षिण मुंबईत ३० वॉर्ड आहेत यामध्ये २१ महिला हे कसं शक्य होऊ शकतं? इतर ठिकाणी दखील काही प्रमाणात अशीच स्थिती आहे. कुर्ला भागात आरक्षण टाकलं, मागच्या वेळी तिथे आरक्षण नव्हतं. २०१२ मध्ये ओबीसी महिला होत्या, आता तो निकष कुठे लागतो, हे आरक्षण पूर्णपणे बायस, पूर्वग्रहदूषित आहे. आयुक्त आणि शिवसेनेने (Shivsena) हे मिळून केले असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.

आमच्या हरकती आणि सूचना मान्य केल्या नाहीत तर आरक्षण सोडत विरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, राज्यात जरी आम्ही एकत्र असलो तर पालिकेत विरोधी बाकावर आहोत. काँग्रेसला गृहीत धरू नका, भाजपाच्या राक्षसाला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचंही म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT