Supruya Sule
Supruya Sule Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News : काँग्रेस कार्यकर्ते दाखवत होते काळे झेंडे, सुप्रिया सुळेंनी गाडीतून खाली उतरत विचारलं कारण, तेव्हा समजलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : राज्यात सत्तांतरानंतरही महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कायम आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनिमित्त महाविकास आघाडी पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहे. एकीकडे हे चित्र असताना पुण्यात मात्र काँग्रेस समर्थकांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार समोर आला आहेत. पुण्यातल्या भोरमध्ये नीरा डावा कालव्याच्या कामाचं भूमीपूजन करण्यासाठी सुप्रिया सुळे (Supriya Sule) आल्या होत्या. त्यावेळी श्रेयवादाच्या मुद्दावारुन काँग्रेस समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.

वेल्हा मुळशी क्षेत्रातील आमदार संग्राम थोपटे यांनी या कालव्याचा प्रश्न प्रश्न मार्गी लावल्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र तरीही सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कालव्याचा उद्घाटन का? तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप संग्राम थोपटे समर्थकांनी केला आहे. (Latest News)

नाराज काँग्रेस समर्थकांची समजूत काढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरून थोपटे समर्थकांशी चर्चा केली, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विसंवादाने हे घडलं आहे. पुढच्या कार्यक्रमला स्वतः संग्राम थोपटेंशी संवाद साधून त्यांना सहभागी करून घेऊन पुन्हा कार्यक्रम घेऊ, असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी थोपटे समर्थकांना दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : गंगा नदीची पूजा, क्रूझ राईडचा आनंद; वाराणसीतून नरेंद्र मोदी आज भरणार उमेदवारी अर्ज

IPL 2024 Playoffs: क्रिकेट फॅन्ससाठी गुड न्यूज! CSK आणि RCB दोघंही जाऊ शकतात प्लेऑफमध्ये; वाचा समीकरण

Crocodile Video: बापरे बाप! चिखलात लपली भली-मोठी मगर; शेपटीवर पाय पडला अन् पाहा थरारक व्हिडिओ

Police Constable Viral Video: सलाम तुझ्या जिद्दीला! दिल्ली पोलिस महिला कर्मचारी बाळाला पाठीवर घेऊन करतायत काम; VIDEO VIRAL

Today's Marathi News Live : PM नरेंद्र मोदी दर्शनासाठी काल भैरव मंदिरात

SCROLL FOR NEXT