Shrikant Deshmukh News Update SAAM TV
मुंबई/पुणे

श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार

श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित महिलेने मेलद्वारे राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. घराबाहेर पडायला भिती आहे, म्हणून मी मेलद्वारे तक्रार करत आहे अस या मेलमध्ये म्हटले आहे. महिला आयोगाने मदत करण्याची विनंती महिलेने केली आहे.

या इमेलमध्ये (Email) माझ्यासहिनिशीची तक्रार दखल पात्र गुन्हा (Crime) म्हणून नोंद करण्याबाबत संबंधित पोलिसांना योग्य ते निर्देश द्यावेत वा माझी तक्रार नोंदवण्यासाठी मला मदत करावी अस या मेलमध्ये म्हटले आहे. पुढे सदर आरोपी हा आर्थिक व राजकीयदृष्ट्या बलाढ्य असल्यामुळे मला भीतीपोटी बाहेर जाऊन फिर्याद देणे अशक्य झाल्याने सदरची फिर्याद इमेलद्वारे ऑनलाईन दाखल करत आहे, असं पुढे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

भाजपचे (BJP) सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील महिलेसोबतचा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सदर व्हिडीओतील महिलेने देशमूख यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपची वरिष्ठ नेते खडबडून जागे झाले. त्यानंतर वरिष्ठाच्या आदेशानंतर श्रीकांत देशमुख यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला होता. (Solapur Shrikant Deshmukh News In Marathi )

सदर व्हिडीओत महिलेने श्रीकांत देशमुख फसवणुकीचे गंभीर आरोप केले. सदर व्हिडीओत महिला आरोप करताना म्हणते, 'हा जो माणूस आहे, नाव श्रीकांत देशमुख आहे. यानं मला फसवलं आहे. हा बायकोबरोबरच संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा'. असे आरोप महिलेने देशमुख यांच्यावर केले. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल व्हिडीओनंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानंतर श्रीकांत देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे सोलापूर (Solapur) जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. श्रीकांत देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर सोलापूरच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: रेल्वेत १,२०,५७९ पदांसाठी भरती; मागच्या ११ वर्षात लाखो पदे भरली; वाचा सविस्तर

नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Suraj Chavan Wife Emotional: सासरी जाताना भावाच्या गळ्यात पडून रडली संजना, सुरजच्या बायकोचा भावनिक व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

शिवाजी महाराजांना छत्रपती का संबोधलं जातं? जाणून घ्या ऐतिहासिक अर्थ

SCROLL FOR NEXT