हुश्शsss...२२२ प्रवासी बचावले; हवेतच विमानात बिघाड, कोचीत इमर्जन्सी लँडिंग

एअर अरेबियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते तात्काळ कोची विमानतळावर उतरवण्यात आलं.
Air Arabia flight
Air Arabia flightSaam Tv
Published On

कोची: एअर अरेबियाच्या विमानात (flight) तांत्रिक बिघाड झाल्यानंतर ते तात्काळ कोची विमानतळावर उतरवण्यात आलं. संयुक्त अरब अमिरातमधील शारजाहमधून एअर अरेबियाच्या विमानानं (G9-426) उड्डाण भरलं होतं. कोची विमानतळावर उतरवताना विमानाचे हायड्रोलिक फेल्युअर झालं, अशी माहिती देण्यात आली.

या विमानात सात क्रू मेंबर आणि २२२ प्रवासी होते. विमान सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं शुक्रवारी या घटनेची माहिती दिली.

Air Arabia flight
नवी मुंबईत क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! ३६२ कोटींचे हेरॉईन जप्त

या घटनेनंतर कोची विमानतळावरील विमानांची (flight) वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. काही वेळानं ती पुन्हा सुरू करण्यात आली. कोची विमानतळावरून चेन्नईसाठी पहिल्या विमानानं उड्डाण भरलं आहे. ८ वाजून २२ मिनिटांनी फुल इमर्जन्सी हटवण्यात आली. डीजीसीएच्या निवेदनानुसार, शारजाहहून कोचीसाठी उड्डाण भरलेल्या एअर अरेबियाच्या G9- 426 विमानात हायड्रोलिक फेल्युअर झालं होतं. विमान धावपट्टीवर सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं. इंजिन बंद करण्यात आलं.

Air Arabia flight
ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपवर पहिल्यांदाच बोलली सुष्मिता सेन; म्हणाली, बस्स झालं आता...

यापूर्वी गेल्या महिन्यात एअर अरेबियाचं विमान (flight) अहमदाबाद विमानतळावर तात्काळ उतरवण्यात आलं होतं. विमानाचं इंजिन बंद पडल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. विमानानं बांगलादेशहून अबुधाबीसाठी उड्डाण भरलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com